Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ठाणे मुख्य बातम्या

कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

कल्याण प्रतिनिधी– कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज सादर केला. यामध्ये आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यासह अनावश्यक गोष्टींना कात्री लावण्यात आली आहे. एकंदर अर्थसंकल्पावर नजर टाकली असता डॉ. विजय सूर्यवंशी वास्तववादी अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सध्या प्रशासकीय राजवट लागू आहे. त्यामूळे महापालिका आयुक्तांनीच अर्थसंकल्प सादरही केला आणि मंजूरही केला, हेदेखील यंदाच्या अर्थसंकल्पाचे वेगळेपण म्हणावे लागेल.

आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात 1 हजार 700 कोटींची जमा आणि 1 हजार 699 कोटींचा खर्च तर 99 लाख रुपयांची शिल्लक दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही केंद्रस्थानी ठेवण्यात आल्याचे सांगत आरोग्य सुविधेसाठी 97 कोटी 10 लाखांची तरतूद करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यातही 25 ठिकाणी आपला दवाखाना केंद्र, 4 नविन रुग्णालये, 4 डायलिसिस सेंटर, मॉड्युलर ओटी (opretion theatre), कॅथलॅब, पॅथॉलॉजी लॅब, रेडिओलॉजी, पीपीपी तत्वावर वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीतील 22 रस्त्यांचे सौंदर्यीकरण, 13 तलाव-मैदाने आणि चौकांचे सुशोभीकरण करणे, स्मार्ट आणि सुरक्षित शहर योजनेंतर्गत 20 ठिकाणी सिग्नल यंत्रणा, 877 ठिकाणी सीसीटीव्ही, 36 पोलीस निरीक्षण वाहनांवर कॅमेरे आणि 45 पोलिसांच्या गणवेशावर कॅमेरे बसवण्याचीही तरतूद करण्यात आल्याचे डॉ. सूर्यवंशी म्हणाले.
तर कोरोनामुळे निर्माण झालेली सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता विकासकामाची प्रत्यक्ष निकड आणि प्राधान्यक्रम ठरवून कामे करण्यात येणार आहेत. विशिष्ट मर्यादेच्या पुढे दायित्व जाऊन पालिकेची आर्थिक स्थिती बिघडणार नाही यासाठी अनावश्यक खर्चात काटकसर आणि कपात करण्याचेही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X