नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली / प्रतिनिधी – डोंबिवली पोलीस स्टेशन परिसरात घरडा सर्कल Banquet हॉल येथे , साखरपुड्याच्या कार्यक्रम सुरु होता. फिर्यादी नववधू महिलेच्या तक्रारीनुसार त्यांच्या पर्स मध्ये ठेवलेले त्यांचे सोन्याचे इअर रिंग्स, गळ्यातील सोन्याची चैन आणि 5000 रुपये कॅश ,असे एकूण 70,000/-किंमतीचा मुद्देमाल चोरी केला गेला आहे.फिर्यादीने तत्काळ स्थानिक पोलीस स्टेशनला आपली तक्रार नोंदविली,त्यानुसार डोंबिवली रामनगर पोलीस शोध पथकाने गुन्हेगाराचा शोध सुरु केला असता, त्यादरम्यान मेकअप करण्यासाठी आलेल्या पार्लरवाल्या दोन महिला संशयितरीत्या कार्यक्रमातून लगबगीने बाहेर पडल्या होत्या हे ध्यानात आले.
सदर गुन्ह्याचा तपास सपोनि सानप, पोहवा सरनाईक, पोहवा कुरणे, पो अं पोटे, मपोहवा सूर्यवंशी हे करत असताना नमूद गुन्हाचे घटनास्थळाचे CCTV फूटेज तपासणी केली असता त्यात फिर्यादी यांचा मेकअप करण्यासाठी आलेल्या दोन महिला संशयित असाव्यात म्हणून शोध तपास सुरु झाला. त्यांचे मोबाईलच्या तांत्रिक तपासाच्या माध्यमातून लोकेशन स्ट्रेस केले असता, त्या दावडी सोनारपाडा डोंबिवली पूर्व परिसरात असल्याचे समजले. डोंबिवली रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी गाडीची वाट पाहत असताना ,शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले गेले. नमूद गुन्ह्यातील दागिने व 3000/- रुपये असे एकूण 68,000/-चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. व विविध कलमान्वये दोघींवर गुन्हे दाखल करण्यात आले,