Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ताज्या घडामोडी देश

परस्पर संरक्षण सहकार्यासाठी ब्राझील लष्कर कमांडर भारत दौऱ्यावर

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्‍ली / प्रतिनिधी – ब्राझिलियन लष्कराचे कमांडर जनरल टॉमस मिगुएल माइन रिबेरो पायवा हे 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2023 दरम्यान सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. भारत आणि ब्राझील या दोन देशांमधील लष्करात दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करण्यात ही भेट एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

जनरल टॉमस यांनी आज 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी जनरल टॉमस यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला पुष्पचक्र  अर्पण करून अभिवादन केले आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या भारतीय सशस्त्र दलातल्या शहीद वीरांना आदरांजली वाहिली. त्यानंतर,जनरल टॉमस यांना नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्स येथे गार्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला. यावेळी टॉमस यांनी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचीही भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांच्या लष्कर प्रमुखांनी आपल्या विचारांची देवाणघेवाण केली आणि विविध समकालीन विषयांवर सकारात्मक चर्चा केली. उभय देशांच्या सैन्यांमधील द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्याच्या मुद्द्यांवरही त्यांनी यावेळी चर्चा केली.

जनरल टॉमस यांनी नंतर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांची भेट घेतली तसेच संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्याशीही संवाद साधला. यावेळी झालेल्या चर्चेने दोन्ही राष्ट्रांमधील संरक्षण सहकार्य आणि सहकार्य वाढवण्याच्या सामायिक उद्दिष्टांना अधोरेखित केले.

आपल्या या भेटीदरम्यान, जनरल टॉमस यांनी लष्कराच्या मुख्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांशीही सकारात्मक संवाद साधला ज्याच्या माध्यमातून ज्ञान आणि विचारांची व्यापकपणे देवाणघेवाण साध्य झाली. अशा प्रकारच्या भेटींमधून परस्पर देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याची प्रतिबद्धता तसेच लष्करांमधील सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी मदत मिळते.

ब्राझिलियन लष्कराचे जनरल टॉमस यांची ही भेट भारत आणि ब्राझीलच्या सैन्यांमधील खोलवर रुजलेल्या बंधांना अधोरेखित करते. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील केवळ लष्करी सहकार्य बळकट होण्याबरोबरच परस्पर सुरक्षा सहकार्य, जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी दोन्ही देशांची बांधिलकी आणखी दृढ व्हायला मदत मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X