नेशन न्यूज मराठी टीम,
अमरावती / प्रतिनिधी – शासकीय आणि अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांची आज क्षमता परीक्षा होती. अमरावती जिल्ह्यातील आश्रम शाळेतील शिक्षकांनी या परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे.या परीक्षेला शिक्षकांनी परीक्षा केंद्राबाहेर घोषणाबाजी करत विरोध केला आहे. परीक्षेला बसण्यात देखील नकार दिला आहे.
परीक्षा देण्यात शिक्षकांना व्यस्त करू नका, याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होईल असा थेट इशारा शिक्षकांनी दिला आहे. आदिवासी विभागाच्या या निर्णयाला आमदार धीरज लिंगाडे यांनी निवेदन देऊन ही परीक्षा रद्द करण्यासंदर्भात पाठपुरावा केला. आश्रम शाळा बंद करून विशिष्ट कंपन्यांकडे वळवायचे असल्याचा घाट दिसत आहे असे मत धीरज लिंगाडे यांनी व्यक्त केले.