नेशन न्यूज मराठी टीम.
हिंगोली/प्रतिनिधी – बांधकाम कामगारांना देण्यात येणारे मध्यान्ह भोजन हे अत्यंत निकृष्ट दर्जाची असून हे अन्न जनावरांना खाण्याच्या सुद्धा कामाचे नसल्याने ही योजना बंद करून कामगारांच्या खात्यात थेट 5000 रुपये अनुदान दरमहा देण्यात यावे तसेच बोगस कामगारांची नोंदणी करून लाखो रुपयांची लूट गुत्तेदार आणि अधिकारी करत आहेत याची चौकशी करून गुत्तेदार आणि अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे..या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्ह्यामार्फत आंदोलन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रविंद्र भाऊ वाढे,जिल्हा सचिव ज्योतीपाल रणवीर,जेष्ठ नेते विनोद नाईक,प्रा.अनिल कुरहे,शहर अध्यक्ष शेख अतीखुर रहेमान,हिंगोली तालुका अध्यक्ष प्रणव जोंधळे यांच्या नेतृत्वात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी आमच्या मागण्या तत्काळ मान्य करा अन्यथा 26 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी बबन भूकतर,जिल्हा प्रवक्ते शंकर पोघे,युवा जिल्हाध्यक्ष योगेश नरवाडे,जिल्हा सचिव भीमा सुर्यतल,शेख नाजेर,भूषण पाईकराव,शेख नजीब,शेख अतीख,शेख अमीन,डॉ.सिद्धार्थ वाघमारे, सुदामा सिंगारे,जिल्हा सचिव मिलिंद पडघन,लखन खंदारे,योगेश सिंगारे ,सुशील कसबे,अन्वर पठाण,शेर खान पठाण,योगेश भालेराव,सुरेश कांबळे,सिद्धार्थ कांबळे,बालाजी पट्टेबहादुर,गौतम धाबे,आकाश गायकवाड,विक्की कांबळे,सचिन भिसे, आकाश गायकवाड,प्रल्हाद धाबे,
इत्यादी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.