नेशन न्यूज मराठी टीम.
बीड / प्रतिनिधी – ओबीसींच्या हक्काचे आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी बीड मध्ये सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर ओबीसी संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जवळपास अर्धा तास चाललेल्या या रास्ता रोकोमुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
ओबीसींचे आरक्षण कायम ठेवावे, मराठा समाजाला वेगळी तरतूद करून आरक्षण द्यावे, प्रशासनाने केलेल्या सर्वे मधून फार कमी नोंदी बीड जिल्ह्यात कुणबी असल्याच्या आढळल्या आहेत. यामुळे सरसकट कुणबी आरक्षण लागू करू नये, प्रशासनावर आरक्षणासाठी दबाव आणला जात असला तरी प्रशासनाने या दबावाला बळी पडू नये अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.