कल्याण/संघर्ष गांगुर्डे – एस टी कामगारांना कायमस्वरूपी शासनात विलनीकरण करण्यात यावे यासाठी राज्यभर एस टी चालक व वाहकाचे आंदोलन सुरू आहे.तसेच मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील असे कामगारांन कडून सांगण्यात आले.राज्य शासनाकडून एस टी कामगारांना कामावर रुजू होण्यास सांगतीले आहे.कामावर रुजू न झाल्याने कल्याण आगारातील १६ कामगारांना कामावर रुजू न झाल्याने निलंबनाची कारवाई केली असल्याचे कामगारांन कडून यावेळी सांगण्यात आले.
एस टी कामगारांचे पगार अत्यंत कमी आहे.तो पगार ही वेळेत होत नाही पगारात वाढ होणे तसेच कायमस्वरूपी शासनात विलनीकरण व्हावं यासाठी एस टी कामगारांचा कल्याण आगारात अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.यावेळी कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भाजप चे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एस टी कामगारांची भेट घेत.त्याच्या आंदोलनात सहभागी झाले. त्यावेळी ठाकरे सरकार वर सेटिंग व सेटलमेंट चे आरोप सोमय्या यांनी केले.तसेच सरकार ने एस टी कामगारांन सोबत बसून त्याच्या मागण्या सरकारने मान्य करावे असे सोमय्या यांनी यावेळी सांगितले.