नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
जालना/प्रतिनिधी – देशात सर्वत्रच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील मतदारसंघात 13 मे रोजी लोकसभा निवडणूका पार पडणार आहेत. जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये जालना, बदनापूर, भोकरदन ,सिल्लोड, फुलंब्री, आणि पैठण या सहा मतदारसंघाचा समावेश आहे. जालना लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतून डॉ.कल्याण काळे यांना तर महायुतीकडून रावसाहेब दानवे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कल्याण काळे यांना पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढली असून त्याचा फायदा मविआला येत्या लोकसभा निवडणुकीत होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.
जालना शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला मतदारांना संबोधित करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा येणार होते. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून परवानगी न मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे या सभेला येऊ शकले नाही.
जालन्यात झालेल्या महाविकास आघाडीच्या या प्रचार सभेत कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी मोदी सरकारवर आपल्या भाषणातून जोरदार हल्ला चढवला. “मी नागरिकांना आवाहन करतो की नागरिकांनी या फेकू लोकांच्या नादी न लागता विकास पुरुष राहुल गांधी यांच्याच काँग्रेसला प्रचंड बहुमताने विजय करत इंडिया आघाडीच्या उमेदवारांना पुन्हा संसद मध्ये पाठवून जनतेच्या विकासाचा मुद्दा मांडण्यासाठी लढवय्या सैनिक संसदेत पाठवायचा आहे.” त्यामुळे मतदार राजांनी जालना लोकसभेचे अधिकृत इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याणराव काळे यांना प्रचंड बहुमताने विजयी कराण्याचे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “मोदी महागाईवर बोलत नाही, हिन्दू मुस्लीम वर बोलतात ही भूमिका आता चालणार नाही. कारण आता हिंदू बांधव व मुस्लिम बांधवही हुशार झाले आहेत. त्यांना कळत आहे की कोण आपले आणि कोण परके आहेत. भाजप फक्त दोन समाजात तेढ निर्माण करून पाहण्याची भूमिका घेते हे आता सर्व मतदारांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या जुमले बाजी करणाऱ्या मोदींना आता जनता घरी बसवणार” असल्याचा दावाही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केला. देशात आघाडीच सरकार आल्यावर गरीब कुटुंबाच्या महिलेला 1 लाख रू वार्षिक देण्यात येईल. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्याच काम काँग्रेस करणार असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी आपल्या सभेत केला.
“जर महाविकास आघाडीचे सरकार आले तर शेतकऱ्यांच्या औजारावर GST लागू होणार नाही. शेतकऱ्याला GST मुक्त करू. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या उमेदवाराला संपविण्याची संधी आलेली आहे. विदर्भामधून गडकरी सहीत पूर्ण भाजप साफ होईल. पश्चिम महाराष्ट्रात सुध्दा बीजेपीचा सुपडा साफ झालेला आहे. उद्योगपतींचे कर्ज माफ केले, परंतू शेतकऱ्यांचे कर्ज माफ यांनी केले नाही. अजित पवार सहीत सर्व भ्रष्टाचारी लोकांना भाजपने आपल्या जवळ केले.” अशी जहरी टीका त्यांनी मोदी सरकारवर केली. तसेच “देशाचे चित्र बदललेले आहे. युपीमध्ये सुध्दा इंडिया आघाडीला 50 पेक्षा जास्त जागा मिळत आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी कल्याण काळे यांना निवडून दया” असे मतही विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.