Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
राजकीय व्हिडिओ

भाजपने सहा ठेकेदारांना महाराष्ट्र विकला, आ. प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

नेशन न्यूज मराठी टीम.

सोलापूर/प्रतिनिधी – गोरगरीबांचा आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्यासाठी भाजपने मोठ्या सहा ठेकेदारांना महाराष्ट्र विकला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आज पंढरपुरात केला. भाजपने ठेकेदारी पध्दतीने नोकरी भरती सुरू केली आहे. यामुळे उपेक्षित लोकांचा आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भाजपने सर्व सामान्य गरीब लोकांचे आरक्षण रद्द करण्याचे षडयंत्र रचले आहे. ठेकेदारीमुळे अनेक तरूणांना सरकारी नोकरीला मुकावे लागणार आहे.अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

त्याच बरोबर भाजपने आपल्या डोक्यावर ५० खोक्यांचे सरकार आपल्यावर बळजबरीने थोफावलेले सरकार आहे. ते काही लोकशाहीने निवडून आलेले सरकार नाही असा टोलाही यावेळी प्रणिती शिंदे यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.

महाराष्ट्रातला शेतकरी व इतर जनता महागाईने निराश झाली आहे. राज्याला एक स्थिर सरकार हे फक्त महाविकास आघाडी सरकार देऊ शकते. असेही यावेळी त्या म्हणाल्या.

काँग्रेस पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडली जाईल. येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पंढरपूर विधानसभेत आणि सोलापूर लोकसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल असेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X