Default Image राजकीय

कल्याण मध्ये नाना पटोले यांच्या विरोधात भाजपची निदर्शने

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/p6VcYFNbPkE

कल्याण– काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटताना दिसत असून कल्याणातही भाजपतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. कल्याण पूर्वेत भाजप झालेल्या या आंदोलनात भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नाना पाटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपकडून त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षे व्यवस्थेतील त्रुटीनंतर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षाकडून करण्यात आलेले हे वक्तव्य संशयास्पद असल्याचे सांगत आघाडी सरकारने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी भाजपतर्फे करण्यात आली. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर ज्याप्रमाणे कारवाई केली तशी कारवाई करण्याची हिंमत आघाडी सरकारने दाखवावी अशी संतप्त मागणीही यावेळी कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केली.

दरम्यान कल्याण पूर्वेतील काटेमानिवली चौकात झालेल्या या निदर्शना नंतर कोळसेवाडी पोलिसांना आपल्या मागण्यांचे निवेदनही भाजपतर्फे देण्यात आले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »