नेशन न्यूज मराठी टीम
अमरावती / प्रतिनिधी – 11 तारखेला अमरावतीच्या नवहाथे चौकात आ.रवी राणा व खा. नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने दहीहंडी चे आयोजन केले असता तेथील हॉकर्स च्या हातगाड्या हटवून त्याचा रोजगार बुडवल्याच्या आरोप भाजपचे माजी गटनेते तुषार भारतीय यांनी केला होता. त्यामुळे नुकसान झालेल्या 100 हॉकर्स ला प्रत्येकी 2100 रुपयाच्या चेक चे वाटप करण्यात आले. त्यामुळे राणा दाम्पत्याला भाजपा कडून अमरावती मध्ये उघड विरोध होताना दिसून येत आहे.
लाखो रुपये खर्च करून नट्या आणतात पण हॉकर्स चा विचार तुम्ही करत नाही, कामाच्या भरोशावर मत मिळत नाही म्हणून ,सेलिब्रिटी आणायचे व नेत्यांना गर्दी दाखवायची असा टोला भाजपा चे माजी गटनेते तुषार भारतीय यांनी राणा दाम्पत्याला लागावला.या ठिकाणी दहीहंडी चा राजकीय वापर होत असेल तर हिंदू कसा सहन करेल? देवेंद्र फडणवीस त्या दहीहंडीला अतिथी म्हणून आले होते ते आयोजक नव्हते मात्र आम्ही त्यांना हे सगळं सांगणार आहे असेही भारतीय यांनी सांगितले.