नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – होवू घातलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीच्या धर्तीवर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर चांगलेच ताशोरे ओढले.पटोले म्हणाले कि, इंडिया आघाडीची बैठक महाराष्ट्रातील मुंबई येथे होत आहे, या बैठकीचे शिवरायांच्या भूमीवर आगळ वेगळं महत्त्व आहे. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजाची भुमी आहे, या भुमीवरुन मोठा संदेश जनतेला दिला जाणार आहे.
कॉंग्रेसने या बैठकीच्या आयोजनात महत्वाची भूमिका बजावली आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी काँग्रेसलाच पाठिंबा दिला असता. या देशाच्या संविधान व्यवस्थेला तोडण्यासाठी काँग्रेस कधी झालं नव्हतं. देशातील लोकांना न्याय मिळवुन देण्यासाठी काँग्रेस सत्ता उभी राहिली.
भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत. प्रधानमंत्र्याचं शहादं शहिद झालेलं आहे. पार्टी विथ difference सांगणारे भाजप आता 70 हजार कोटींचे आरोप करून मग त्यांनाच सोबत घेऊन सरकार बनवायचं. रोज लोकशाहीचा खून केला जात आहे.
सुरुवातीला अंतर्गत औपचारिक चर्चा सभा होणार आहे राहुल गांधी त्यावेळी बोलतील.ही फक्त स्वागताची नाही तर युद्धाची तयारी आहे. असे पटोले म्हणाले.