महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image क्रिडा चर्चेची बातमी

२१ वर्षांखालील महिला हॉकी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी साई आणि प्रीतम सिवाच संघांचे मोठे विजय

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

अर्जुन पुरस्कार विजेते आणि 1964 च्या ऑलिम्पिक (ट्रिपल ऑलिम्पियन) स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते हरबिंदर सिंग आणि अर्जुन पुरस्कार विजेते डबल ऑलिम्पियन देवेश चव्हाण यांच्या हस्ते चषकाचे अनावरण करत रविवारी नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर 21 वर्षांखालील दुसऱ्या खेलो इंडिया महिला हॉकी स्पर्धेचं उद्घाटन झालं.

आज एकूण दोन सामने झाले ज्यात भारतीय क्रीडा प्राधिकरण ए संघाने सॅल्यूट हॉकी अकादमीचा 13-0 असा पराभव केला तर प्रीतम सिवाच हॉकी अकादमीने एच आय एम हॉकी अकादमीला 11-0 असं हरवलं.

भारताचं तीन वेळा ऑलिम्पिक खेळांमध्ये प्रतिनिधित्व करणारे आणि हॉकी इंडियाच्या राष्ट्रीय निवड समितीचे सदस्यसुद्धा असलेले हरबिंदर सिंग दुसऱ्या खेलो इंडिया महिला हॉकी स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारत सरकारनं महिला हॉकी स्पर्धेचं आयोजन करणे हाअत्यंत स्तुत्य प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. येत्या काळात या खेलो इंडिया स्पर्धेतून देशाला आघाडीचे खेळाडू मिळतील जे भारतासाठी खेळतील आणि ऑलिंपिक मध्ये पदक देखील मिळवतील असं त्यांनी सांगितलं.

“यावर्षी आणि गेल्या वर्षी 21 वर्षांखालील आणि 16 वर्षांखालील श्रेणीत झालेल्या दोन महिला खेलो इंडिया स्पर्धांचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल खेलो इंडिया आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचं अभिनंदन करत आहे” असं ते म्हणाले. यात भाग घेणारे सर्व संघ आणि सर्व खेळाडूंना आपल्या शुभेच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं.

दोन वेळा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारे देवेश चव्हाण हे यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले की भारत सरकार खेलो इंडिया स्पर्धांच्या माध्यमातून प्रतिभावान खेळाडूंना अनेक संधी देत आहे. कठोर मेहनत घेऊन भारतासाठी खेळण्याचं आपलं स्वप्न साकार करणे ही आता प्रत्येक खेळाडूची जबाबदारी आहे असं त्यांनी सांगितलं.

यावेळी पियुष दुबे (भारताचे हॉकीसाठी उच्च कामगिरी व्यवस्थापक) आणि टोकियो ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक यांच्यासह राष्ट्रीय स्टेडियमचे प्रशासक दिलीप सिंग हेसुद्धा उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×