नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
जळगाव/प्रतिनिधी – जळगाव एम आय डी सी परिसरातील मोरया केमिकल कंपनीला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आग लागली. आग लागल्यानंतर केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला. त्यामुळे आग आणखी वाढतच चालली आहे. आगीचे लोट हवेत दूरवर पसरलेत. परिसरातून धुराचे लोळ दिसू लागल्यावर सगळीकडे एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. केमिकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीत कंपनीत काम करणारे चार जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेत कंपनीचे मोठे नुकसान झाले शिवाय कंपनीत काम करणारे मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तीस ते चाळीस अग्नीशमन दलाची वाहाने घटनास्थळी दाखल झाली आहेत.अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. आग अटोक्यात येत नसल्याने आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.