Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image देश लोकप्रिय बातम्या

तिन्ही सेवा दलांचा द्वैवार्षिक संयुक्त सराव “ॲम्फेक्स -२०२३” चा समारोप

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – आंध्र प्रदेश मधील काकीनाडा,  येथे  17 ते 22 जानेवारी 23 या कालावधीत तिन्ही  सेवा  दलांचा द्विवार्षिक संयुक्त सराव ॲम्फेक्स  -2023 आयोजित करण्यात आला. तिन्ही सेवा दलांमध्ये विविध पैलूंमध्ये परस्परसंवाद आणि आंतरकार्यक्षमता वृद्धिंगत व्हावी हे  ॲम्फेक्स या संयुक्त प्रशिक्षणाचे  उद्दिष्ट आहे.

ॲम्फेक्स -2023 हा संयुक्त सराव यावर्षी प्रथमच काकिनाडा येथे घेण्यात आला आणि आतापर्यंत घेतलेल्या ॲम्फेक्स सरावांपैकी हा सर्वात मोठा होता. पाच दिवस सुरु असलेल्या या सरावात  सहभागी झालेल्या दलांनी विविध प्रकारच्या जटील सरावात भाग घेतला. या संयुक्त सरावाच्या  यशस्वी समारोपाचा आढावा   AVSM, NM, चीफ ऑफ स्टाफ, ईस्टर्न नेव्हल कमांड व्हाइस ऍडमिरल  संजय वात्सायन, यांनी  भारतीय नौदल आणि भारतीय लष्कराच्या फोर्स कमांडर्सच्या उपस्थितीत घेतला.

या सरावात भारतीय नौदलाच्या मोठ्या प्लॅटफॉर्म डॉक (LPD), लँडिंग शिप्स आणि लँडिंग क्राफ्ट्स, मरीन कमांडोज (MARCOS), हेलिकॉप्टर आणि विमानांचा समावेश असलेल्या अनेक जहाजांचा सहभाग होता. भारतीय सैन्याने विशेष दले, तोफखाना आणि चिलखती वाहनांचा समावेश असलेल्या 900 हून अधिक तुकड्यांसह  या सरावात भाग घेतला. या सरावात जग्वार लढाऊ विमाने आणि भारतीय हवाई दलाची  सी 130 विमानेही सहभागी झाली होती.

ॲम्फेक्स 2023 मध्ये भारतीय सैन्याने केलेल्या यशस्वी प्रात्यक्षिकांमुळे सैन्याचे  जमीन, जल आणि आकाश या तिन्ही  क्षेत्रातील प्रभुत्व दिसून आले. याशिवाय अशा प्रकारच्या संयुक्त परीचालनाचा संपूर्ण कार्यभार  हाती घेण्यासाठी तिन्ही  सेवांमध्ये असलेला  उत्कृष्ट समन्वय दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X