गडचिरोली/प्रतिनिधी – गडचिरोली जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून प्रत्येकाच्या हाताला काम मिळाल्यास नक्षलवाद संपेल असे प्रतिपादन जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
रोजगार निर्मितीसाठी आवश्यक सोयीसुविधा व दळणवळणाची साधने जिल्ह्यात उभी राहत असल्याचे ते म्हणाले. पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते जिल्ह्यातील 27 कोटी रू. कामांच्या शुभारंभासह 46 वाहने व ॲम्ब्युलन्स, ऑक्सिजन प्लांट, जलतरण तलावाचे लोकार्पण संपन्न झाले. यावेळी सोबत इतर मागास बहूजन कल्याण विकास मंत्री तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. जिल्हा पोलीस क्रीडांगणावर नगरपरिषदेकरीता आलेल्या फायरब्रिगेड गाड्या, आरोग्य विभागाला मुख्यमंत्री निधीमधून मिळलेल्या 9 रूग्णवाहिका, 24 लसीकरणासाठी आलेल्या रूग्णवाहिका तसेच पोलीस विभागाला जिल्हा नियोजन मधून दिलेल्या ९ वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस उप महानिरिक्षक संदिप पाटिल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, नगराध्यक्षा योगिता पिपरे, जिप उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, जिप सदस्य ॲड.रामभाऊ मेश्राम उपस्थित होते.
या कार्यक्रमाला उपस्थितांना उद्देशून पालकमंत्र्यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले जिल्ह्यात विकास कामांना गती देत असताना सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवा. राज्य शासनाबरोबर केंद्राकडूनही चांगल्या प्रकारे जिल्ह्यासाठी मदत मिळत आहे. नुकतेच 500 केाटींचे रस्ते व पुलांच्या कामाला मंजूरी मिळाली आहे. जिल्हयातील प्रतिक्षेत असलेले मेडीकल कॉलेजही लवकरच अंतिम टप्प्यावर आणू असे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी आपाआपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अजय कंकडालवार यांनी जिल्ह्यातील ब्रीज कम बंधारे यातून दळणवळणाला चालना मिळाल्याचे सांगितले. यावेळी पोलिस क्रीडांगणावर नव्याने बांधण्यात आलेल्या किल्ला भिंतीचे अनावरण करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामे, नवीन कामांचे शुभारंभ पाहून मला असे वाटतेय की ‘अब गडचिरोली बदल रही है’ असे उद्गार आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काढले. सद्या पालकमंत्री व आम्ही जिल्ह्यासाठी विकासाचं मोठं पाऊल टाकत आहोत. या आलेल्या वाहनांमुळे दुर्गम भागातील आरोग्य विषयक गरजा पुर्ण होतील असे ते यावेळी म्हणाले. येत्या काळात गडचिरोलीसह चंद्रपूरसाठी नव्या पध्दतीचे आधुनिक आपत्ती मध्ये मदत करणारे वाहन पुरविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी जिल्हा सामान्य रूग्णालयातील नव्याने स्थापन केलेल्या ऑक्सिजन प्लांटचा शुभारंभ केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते 200 ऑक्सिजन कॉन्संट्रेटरचे व बायोमेडीकल वेस्टेज व लाँड्रीचा शुभारंभही करण्यात आला. यानंतर कॉम्प्लेक्स परिसरातील स्मृती उद्यानाच्या 2.5 कोटी रूपये नूतनीकरण कामाचा शुभारंभही त्यांनी केला. कॉम्प्लेक्स परिसरातीलच नव्याने नूतनीकरण केलेला जलतरण तलावाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. विशेष म्हणजे यावेळी दोन्ही मंत्र्यांनी क्रीडा संकुल मधील बॅडमिंटन कोर्टवर खेळून क्रीडा विषयक संदेश दिला.
पोटेगाव रस्त्यावरील जिल्हा क्रीडा संकुलाच्या नविन बांधकामाकाचे भूमिपूजन ही करण्यात आले. याकरीता अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून रु. 44.51 कोटीचे अंदाजपत्रक व आराखडे तयार केला आहे. यातील 27 कोटी रूपयांना प्रशासकिय मान्यता मिळाली आहे. पैकी बांधकामाकरीता रुपये 24 कोटी 31 लक्ष रूपयाचे काम सुरू करण्यात येणार आहे. माहे ऑगस्ट 2021 मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले असून नियोजित कालावधी 18 महिन्याचा आहे. सदर कामामध्ये प्रशासकीय इमारत तयार करणे, इनडोअर हॉल, बॅडमिंटन हॉल, 2 सुरक्षारक्षक कक्ष सोबत 1 मुख्य प्रवेश द्वार, कृत्रिम धावपट्टी (Synthetic Track) बांधण्यात येणार आहे. तसेच पुढील टप्प्यात जिल्हा क्रीडा संकुलाकरीता उपलब्ध असलेल्या जागेवर रुपये 35 कोटी खेळाकरीता नियोजित असून त्यात प्रेक्षक गॅलरी, मुलामुलींचे वसतीगृह, जलतरण तलाव, विविध खेळांचे मैदान, अंतर्गत रस्ते व नाल्या बांधकाम नियोजित आहे.
Related Posts
-
माता रमाई स्मृतीदिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाच्या उंच शिखरावर नेणारी दिव्य…
-
२०० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी दोन जणाना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - खोटी बिले देऊन शासनाचा करोडो…
-
१६५ कोटी रुपयांच्या बनावट विक्री बिलांच्या प्रकरणी दोन जणांना अटक
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी- महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने…
-
शासनाच्या ३ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांचा ५ सप्टेंबरला लिलाव
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - आठ वर्षे…
-
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन
प्रज्ञासूर्य, बोधीसत्व, भारतरत्न, युगपुरुष ,महामानव, क्रांतिसूर्, विश्वभूषण, उच्चविद्याविभूषित, मानवी हक्कांचे…
-
दूधगंगा पतसंस्थेत 80 कोटी रुपयांचा आर्थिक अपहार
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oTT-hLXRWxc अहमदनगर / प्रतिनिधी - संगमनेर…
-
२७ गावातील पथदिव्यांसाठी रुपये २७.९० कोटी मंजूर,आ. राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला आले यश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण ग्रामीण/ प्रतिनिधी - कल्याण…
-
एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य
प्रतिनिधी. मुंबई - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक…
-
आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी
मुंबई/प्रतिनिधी – आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी…
-
२७ ऑगस्टपर्यंत आयटीआय प्रवेशासाठी मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशाकरिता…
-
विनापरवाना साठवणूक केलेले २.३८ कोटी रुपयांचे खत जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील…
-
खाजगी कंपनीच्या संचालकाला १६२ कोटी रुपयांच्या बोगस देयकाप्रकरणी अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - करचुकवेगिरी करुन शासकीय महसूल बुडविणाऱ्या…
-
३ लाख शेतकऱ्यांनी भरली ३१२ कोटी रुपयांची थकबाकी
मुंबई प्रतिनिधी- नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू…
-
रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत जाहीर
प्रतिनिधी अलिबाग- निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले मात्र चक्रीवादळामुळे…
-
जुनी डोंबिवली रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी १३ कोटी ५० लाख मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली येथील पश्चिमकडील जुनी…
-
एसबीआयची ८० कोटी रुपयांची फसवणूक, सीबीआयचे खासगी कंपनीवर छापे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय स्टेट बँकेच्या मुंबई…
-
बुलडाणा तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन
बुलडाणा/प्रतिनिधी - मागील कालावधीमध्ये कोरोना संसर्गामुळे मोठ्या प्रमाणावर खेळाडू व क्रीडा…
-
ऑक्सिजन एक्सप्रेस’द्वारे नाशिक जिल्ह्यासाठी २७.८२६ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त
नाशिक/ प्रतिनिधी - जिल्ह्यातील ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी विशाखापट्टणम् येथून…
-
८१७ कोटी रुपयांचा बनावट जीएसटी इनव्हॉईस घोटाळा उघड
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई विभागातील सीजीएसटी बेलापूर…
-
२७ मे रोजी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ‘पेंशन अदालत’ चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र शासनातीत निवृत्त कर्मचाऱ्यांकरिता अधिदान…
-
२७ फेब्रुवारीपासून कोळसा मंत्रालय व्यावसायिक कोळसा खाणींचा लिलाव करणार सुरू
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोळसा मंत्रालयाने 03…
-
मुंबई विमानतळावर विदेशी महिले कडून २० कोटी रुपयांचे कोकेन जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - नैरोबीहून मुंबईला आलेल्या…
-
मुंबई विमानतळावर १८ कोटी रुपयांचे कोकेन जप्त, दोन प्रवाशी अटकेत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - इथिओपिअन एअरलाईन्सचे विमान ईटी-640 ने…
-
बदलापुरात एकाच दिवशी पकडली १ कोटी १५ लाखांची वीजचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण मंडल कार्यालय…
-
कोरोना काळातही केडीएमसीच्या तिजोरीत विक्रमी ४२७ कोटी कर भरणा
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत यंदा विक्रमी कर भरणा…
-
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर १५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त, विदेशी नागरिकाला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालयाच्या…
-
ठाणे जिल्ह्यात २७ मार्च पासून तृतीयपंथीय मतदार नोंदणी विशेष सप्ताह
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी…
-
चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात कृषी पंपांचे दिवसभराचे भारनियमन रद्द
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया…
-
सुमारे ११७.१४ कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा,मुंबईत एकला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - खोटी खरेदीची बिजके प्राप्त करून…
-
नोव्हेंबर मध्ये जीएसटीतून १,४५,८६७ कोटी रूपयांच्या महसूलाचे संकलन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नोव्हेंबर 2022 मध्ये…
-
लोकअदालतीतून वीज ग्राहकांची १८७८ प्रकरणे निकाली,२ कोटी ७१ लाखांचा भरणा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - तालुका व जिल्हा न्यायालयात…
-
महाराष्ट्रातील पाच नद्यांच्या संवर्धनासाठी ११८३ कोटी रुपये मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्रातील कृष्णा, पंचगंगा, गोदावरी,…
-
वसईत बर्फ बनवणाऱ्या कारखान्याकडून ४ कोटी ९३ लाखांची वीजचोरी
वसई/प्रतिनिधी - वसई तालुक्यातील माजीवली येथील बर्फ बनवणाऱ्या ‘डायमंड आईस…
-
एफएसएसएआय अधिकारी लाचखोरी प्रकरण, सीबीआयला सापडले कोटी रुपयांचे घबाड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय अन्न सुरक्षा…
-
७० ग्राम एमडी आणि २७ ग्राम चरससह एकजण पोलिसांच्या जाळ्यात
नेशन न्यूज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी - अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या…
-
देशभरात डीआरआयची कारवाई, १९ कोटी रुपयांचे सोने केले जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालयाने…
-
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी ८ कोटी ५० लाख निधी वितरित करण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी…
-
२० लाख रुपयांच्या लाच प्रकरणी सात आरोपींना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - 19.96 लाख…
-
कल्याण परिमंडलात एक कोटी २९ लाखांची वीजचोरी उघड
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - महावितरणच्या कल्याण परिमंडलात गेल्या…
-
मासेमारी करणाऱ्या यांत्रिकी नौकाधारकांना दिलासा,डिझेल परताव्याचे १२ कोटी वितरित करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- राज्यातील यांत्रिकी मासेमारी नौकांना डिझेल परताव्याचे…
-
लोकअदालतीत वीज ग्राहकांची १८२४ प्रकरणे निकाली,२ कोटी ६१ लाखाचा भरणा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - तालुकास्तरावर शनिवारी (०९ सप्टेंबर)…
-
महिला आणि बाल सशक्तीकरण योजनेसाठी ४५० कोटी रुपयांचा निधी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक…
-
५७० कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या…
-
बनावट जीएसटी पावत्या जारी करून ११.६१ कोटी रुपयांची फसवणूक, एकाला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पालघर/प्रतिनिधी - पालघर आयुक्तालय, मुंबई विभागाच्या…
-
जात प्रमाणपत्रे ब्लॉकचेन प्रणालीद्वारे, पहिला टप्पा गडचिरोली जिल्ह्यात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत…
-
जे.जे. आणि जीटी रूग्णालयांना आधुनिक वैद्यकीय उपकरणांसाठी १९ कोटी रूपये मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - जे.जे. (सर ज.जी.समूह रुग्णालय)…