महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
पोलिस टाइम्स

भिवंडी पोलिसांकडून पाच गुन्ह्याचा उलगडा, ५ आरोपींना अटक, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी.

भिवंडी– भिवंडी शहरातील शांती नगर पोलिस ठाणे अंतर्गत मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी , चेन स्नॅचिंग, घरफोडी, मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असताना शांतीनगर पोलिसांनी पाच मोठे गुन्हे उघडकीस आणले आहेत.  पोलिसांना मिळालेल्या  गुप्त माहिती मार्फत जबरी चोरी, चैन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी ,घरफोडी, गांजा तस्करी करणारे असे एकूण पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे अली अकबर उर्फ जग्गू जाफरी (वय २१ ) अतिक अहमद अन्सारी ( वय २२ ) मोहम्मद नदीम कुरेशी ( वय २० )  कमाल अहमद अन्सारी ( वय ३४ ) मोहम्मद अफजल वारसी  ( वय २४ ) वर्ष असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत . हे सर्व सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे .  या आरोपींकडून चोरीचा प्रयत्नात वापरलेले एक गावठी कट्टा दोन जिवंत काडतूस , जबरी चोरीसाठी वापरण्यात येणारे मोबाईल, घरफोडी चोरी मध्ये चोरलेले सोन्याची चैन तसेच १२ मोटर सायकल व एक किलो ७०० ग्राम वजनाचा गांजा व लोखंडी तलवार असे एकूण ६ लाख ७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या आरोपींचा अजून कोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का याचा तपास पोलिस करीत असल्याची माहिती भिवंडी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे. 

Translate »
×