Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

भीमा कोरेगाव विजय स्तंभाला ॲड. प्रकाश आंबेडकरांची मानवंदना

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

पुणे /प्रतिनिधी – नवीन वर्षाच्या आणि पहिल्या दिवशी आणि शौर्य दिनाच्या निमित्ताने कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला २०६ वर्ष झाल्याच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी मानवंदना दिली.

त्यानंतर त्यांनी ट्विट करत नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर भीम अनुयायांना आवाहन देखील केले. आपण शेळी, मेंढी नसून सिंह आहोत हे माझ्या लोकांनी कधीही विसरू नये.असे त्यांनी म्हटले आहे.त्यांनी आपल्या सामर्थ्याकडे डोळेझाक केली आहे, परंतु आपण काय चमत्कार करू शकतो हे सर्वांना माहीत आहे. गौरव हा आमचाचं असेल असेही त्यांनी म्हटले आहे.

महार सैनिक आणि पेशवे यांच्यात सन १८१८ साली कोरेगाव भीमा येथे युद्ध झाले होते. महार सैनिकांच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी हा विजयस्तंभ निर्माण केला. या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखों भीम अनुयायी येथे उपस्थित राहतात.यावेळी प्रा. अंजलीताई आंबेडकर, वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, ज्येष्ठ नेते अशोकभाऊ सोनोने, युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यासह अनेकजण उपस्थित होते.

कन्नड चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चेतन कुमार अहिंसा यांनी भीमा कोरेगाव येथे आज सकाळी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X