Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ताज्या घडामोडी शिक्षण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज मध्ये ‘विधी रथ’ स्पर्धा संपन्न

नेशन न्यूज मराठी टीम.

भिवंडी – मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून भिवंडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज द्वारा आयोजित ‘विधी रथ’ स्पर्धेचे बक्षीस वितरण सोमवारी ऑफलाईन पध्दतीने महाविद्यालयात करण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असल्याचे चित्र पाहून शाळा महाविद्यालयांना ऑफलाईन मोडवर येण्याची परवानगी मिळत असतांना भिवंडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजचा पहिला-वहिला बक्षीस वितरण कार्यक्रम थेट महाविद्यालयात साजरा केला. यावेळी खबरदारीच्या उपाययोजना पाळताना विध्यार्थी दिसून आले. तर कोरोनाच्या दीर्घ काळा नंतर प्रथमच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात या उपक्रमात सहभागी होता आल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झालेला पाहायला मिळाला.

महाविद्यालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या विधी रथ स्पर्धेत ब्लॉग रायटिंग व पोस्टर मेकिंग आणि सादरीकरण या विषयांचा समावेश होता. एकूण ३१ विध्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत पोस्टर मेकिंगमध्ये इंग्रजी माध्यमातून द्वितीय सत्रातील विद्यार्थिनी पूजा बक्षी हिने प्रथम पारितोषिक व रनर अप म्हणून अनम अन्सारी तसेच ब्लॉग रायटिंगमध्ये प्रथम पूजा कुमावत, रनर अप प्रमिला साठे तर पलक अग्रवाल हिने काँसोलेशन प्राईज पटकावले.

तर संदेश चौगुले, लतिका पाटील, किशोर गायकवाड हे द्वितीय सत्रातील विद्यार्थी मराठी पोस्टर मेकिंगमध्ये अनुक्रमे प्रथम, रनर अप व काँसोलेशन प्राईजचे मानकरी ठरले. तसेच इंदिरा शिवाणकर, आसावरी कुलकर्णी, शिशिर बोधी यांना मराठी ब्लॉग विजेते म्हणून अनुक्रमे प्रथम, रनर अप व काँसोलेशन प्राईज देऊन सन्मानित करण्यात आले.

महाविद्यालयाच्या सही शिक्क्याचे प्रमाणपत्र, प्रोत्साहन पर रक्कम व उत्तेजनार्थ बक्षीस असे वितरित करण्यात आलेल्या पारितोषिकांचे स्वरूप होते. याव्यतिरिक्त सहभाग घेतलेल्या अन्य विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन प्रमाणित करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या मेहक पठाण, व मॅनेजमेंट कमिटीचे जे. डी. भोईर सर उपस्थिती होते.

‘ठाणे जिल्ह्यात सुमारे पन्नासहून अधिक लॉ कॉलेज असतांना कुठेही मराठी स्पर्धा आयोजित होतांना दिसत नाही. मात्र आपल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही असे उपक्रम साजरे करत राहू,’ असे प्रतिपादन प्राचार्या पठाण मॅडम यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. व्यवसापन कमिटीचे भोईर सर यांनी उपक्रमाला हजेरी लावून उपस्थित विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष बी. डी. काळे यांनी या स्तुत्य उपक्रमासाठी सर्व विध्यार्थी व व्यवस्थापन टीमचे तोंडकौतुक केले.
हे सर्व कार्यक्रमांचे आयोजन बी.डी.बीए.एल .सी चे विद्यार्थी परिषद यांनी केले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X