कल्याण प्रतिनिधी – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे बाबत शासनाने काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.सदर सुचनांच्या अनुषंगाने यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करणे आवश्यक असल्याचे सदर सूचनेत नमूद केलेले आहेत. साधारणत: जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री बारा वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठिक ठिकाणी साजरी केली जाते. परंतु यावर्षी covid-19 वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 8 वाजण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे अपेक्षित असून दरवर्षीप्रमाणे प्रभातफेरी, बाईकरॅली, मिरवणुका यावर्षी जयंती निमित्ताने काढण्यात येऊ नयेत, त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना त्या ठिकाणी अनुयायांची संख्या एकावेळी पाच पेक्षा जास्त नसावी. तसेच तेथे सोशल डिस्टंसिंगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात यावी अशा सूचना शासनाने दिलेल्या आहेत. या सर्व सुचनांचे पालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.
- April 13, 2021