डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली जवळ असलेल्या खोनी परिसरात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत म्हाडाचा प्रकल्प सुरु आहे .2018 साली या घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती .लाभार्थ्यांना मार्च 2021 पर्यन्त घराचा ताबा देण्याचे आश्वासन म्हाडा कडून देण्यात आलं होतं .या घरासाठी लाभार्थ्यांनी 90 टक्के रक्कम देखील भरली मात्र मुदत उलटूनही अद्यापही या इमारतीचे काम सुरू आहे .आज लाभार्थ्यांनी रकमेचा भरणा करून देखील आम्हाला घरे मिळालेली नाहीत. आमचे राहत्या घराचे भाडे भरा अन्यथा शेवटचा हप्ता माफ करा अशी मागणी करत नाराजी व्यक्त केली त्यामुळे आत्ता म्हाडा या बाबत काय भूमिका घेते हे पाहावे लागेल.
डोंबिवलीजवळ खोणी परिसरात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत म्हाडाचा प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पातर्गत 16 इमारती उभारल्या जात आहेत. 2018 साली अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना या ठिकाणी घराची लॉटरी लागली होती. अनेक लाभार्थ्यांनी 2018 ते आत्तार्पयत घराचे हप्ते म्हाडाला भरले आहे. मार्च 2021 पर्यन्त घरांचा ताबा दिला जाणार होता. मात्र अद्याप प्रकल्पाचे काम सुरु आहे. प्रकल्पाच्या कामाची गती पाहता घरे तयार होण्यासाठी आणखीन वेळ लागणार आहे. या प्रकल्पात जवळपास 1 हजार लाभार्थी आहेत. त्यातील काही लाभार्थी आज मोठय़ा संख्येने प्रकल्पाच्या ठिकाणी जमले होते. यावेळी लाभार्थ्यांनी काही लोकांनी 90 टक्के तर जणांनी 100 टक्के हप्ते भरले आहे.म्हाडाने दिलेल्या मुदतीत घरांचा ताबा दिलेला नाही. आम्ही सर्व सामान्य लोक असून आम्ही आत्ता काय करणार. म्हाडा प्रशासनाने आम्ही ज्या ठिकाणी राहतो. त्याठिकाणच्या घराचे आठ हजार रुपये भाडे द्यावे. अन्यथा शेवटचा घराचा 1 लाख 60 हजार रुपयांचा हप्ता माफ करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
या बाबत म्हाडा प्रकल्पाचे अधिकाऱ्याची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र रविवार सुट्टीचा दिवस असल्याने प्रकल्पाच्या ठिकाणी कोणताही अधिकारी उपस्थित नसल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही