महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

आता केडीएमसीच्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या घंटागाड्या

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा संकलनासाठी वापरत असणाऱ्या घंटागाडीच्या ताफ्यात आता सीएनजीवर धावणाऱ्या घंटागाड्या येणार आहेत. कल्याण डोंबिवली मनपाच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या मनपाच्या ११३, खाजगी ५७ घंटागाड्या असुन १२२ प्रभागातील ओला, सुका कचरा सकंलनासाठी त्यांचा वापर होत आहे. सोमवारी नवीन सीएनजी वर धावणाऱी पहिली घंटागाडी मनपाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. 

मनपाच्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या नवीन २५ घंटागाड्या येणार असल्याने कचरा संकलनाचे काम आणखी जलद गतीने करता येईल तसेच दोन गँस् सिलेडर क्षमता असलेल्या एका सीएनजी सिलेंडर मध्ये २००किमी. चालणार असुन इंधनाची बचत होणार आहे. अगामी काळात प्रत्येक आठवड्याला ६ सीएनजीवर चालणाऱ्या घंटागाड्या अशा एकुण २५ घंटागाड्या पालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. पर्यावरण पूरक असल्याने  प्रदूषण कमी होण्यास मदत होईल तसेच भारतात पहिल्यांदा सीएनजीवर धावणाऱ्या घंटागाड्या कल्याण डोंबिवली मनपात येत असल्याचे उप आयुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×