नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवेचा बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते बेलापूर येथे आज शुभारंभ झाला. या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसह पर्यटकांच्या सुविधा मार्गी लागणार असल्याचे बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.मंत्री भुसे यांनी नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बोटीतून बेलापूर ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत प्रवास केला. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.
यावेळी आमदार मंदा म्हात्रे, बंदरे विकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित सैनी, नयनतारा कंपनीचे रोहित सिन्हा यांच्यासह विभागाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
मंत्री भुसे म्हणाले की, या वॉटर टॅक्सीच्या माध्यमातून प्रवासी सुरक्षित प्रवास करू शकतील. ही सुविधा कमीत कमी दरात असून वेळेचीही बचत होणार आहे. पूर्वी बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया या प्रवासासाठी दीड तास लागत होता. तो आता कमी होऊन 55 मिनिटांपर्यंत आला आहे. या उपक्रमासाठी बंदरे विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न मोलाचे ठरले. यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने मान्यता दिली आहे. तसेच केंद्र सरकारने केलेली मदतही महत्त्वाची ठरली आहे. पुढील कालावधीत गेटवे ऑफ इंडिया जवळील रेडिओ क्लबजवळ नवीन जेट्टी निर्माण करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रवासी बोटीसाठी सुविधा निर्माण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विभागाच्या पाठिशी असून अशा प्रकल्पांच्या माध्यमातून रस्त्यावरच्या वाहतूक समस्येतून मुक्तता मिळणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. भविष्यात प्रवाशांना आणखी व्यवस्था उभारण्याकरिता ठाणे जवळील ‘रॉक क्रिक’ चा काही भाग तोडल्यास पालघर, वसई, ठाणे, बेलापूर अशी प्रवासी जल वाहतूक उपलब्ध होईल. अशा वेगवेगळ्या योजनांना विभागाच्या वतीने गती देण्यात येत आहे, मंत्री भुसे यांनी सांगितले.
• बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया हे रस्तामार्गे अंतर ४० कि.मी असून त्या करिता अंदाजे १ तास ४५ मिनिटे इतका अवधी लागतो. परंतु बेलापूर ते गेटवे हे जलमार्ग अंतर २४ कि.मी असून त्याकरिता फक्त एक तासाचा अवधी लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे.• जेट्टीचे काम हे केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेंतर्गत करण्यात आले असून या कामासाठी ८.३७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
या खर्चासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत ५०:५० या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच वाहनतळ व इतर सुविधांसाठी ठाणे जिल्हा नियोजन समितीकडून ४.३५ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला होता. या ठिकाणी ७५ चार चाकी आणि ८५ दुचाकी वाहनाकरिता वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.• मेसर्स नयनतारा शिपिंग प्रा. लि यांचेकडून नयन XI या बोटीद्वारे ही वॉटर टॅक्सी सेवा सुरु आहे. देशातील पहिली २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवार दरम्यान बेलापूर – गेटवे ऑफ इंडिया या जलमार्गावर धावणार आहे.
सकाळी ८.३० वाजता बेलापूर-गेटवे ऑफ इंडिया आणि संध्याकाळी ६.३० वाजता गेट वे ऑफ इंडिया -बेलापूर अशा दोन फेऱ्या होणार आहेत. जलवाहतुकीचा प्रवास सर्वसामान्य लोकांकरिता सुलभ, सोईचे व लवकर होण्यासाठी या कंपनीमार्फत सद्यस्थितीत सामान्य बैठकीसाठी रु २५०/- व बिझनेस क्लास करिता रु. ३५०/- इतके तिकीट दर आकारण्यात येणार आहे. या वॉटर टॅक्सीचे ऑनलाईन बुकीग My Boat Ride या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.• १ जानेवारी २०२२ पासून नव्याने सुरु झालेल्या जलमार्गावरील फेरी आणि रो-रो बोटीद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच पाळीव प्राणी, वाहन, माल इत्यादीवर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून आकारल्या जाणाऱ्या प्रवासी करात पुढील ३ वर्षासाठी म्हणजेच १ जानेवारी २०२२ पासून ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सूट देण्यात आली आहे.
Related Posts
-
डोंबिवलीच्या जलतरंण पटूने कारंजा पोर्ट ते गेटवे ऑफ इंडिया अंतर यशस्वीपाने पोहून केले पार
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - साईश मालवणकर याने रात्री…
-
मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवेचे उद्या सुरवात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - रस्ते आणि रेल्वे वाहतूक व्यवस्थेवरील…
-
बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदासोबत इरेडाचा सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम.नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील अक्षय ऊर्जा वाढीला…
-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा आजाद मैदान येथे मोर्चा
प्रतिनिधी. मुंबई - मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय तसेच पीपल्स एज्युकेशन…
-
नवी मुंबई महानगरपालिकेचे राष्ट्रीय स्तरावरील तीन ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - ‘इंडियन…
-
मुंबईत ५ ते ९ जानेवारी दरम्यान इंडिया जेम अँड ज्वेलरी मशिनरी एक्स्पो
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट…
-
लालूप्रसाद यादव इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - २०१४ पासून…
-
पोलीस कॉन्स्टेबलची एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती पोलीस…
-
नेहरू युवा केंद्राकडून मुंबई ते गोवा पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्राकडून 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत…
-
आता पुणे ते बँकॉक थेट विमानसेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय नागरी विमान…
-
उद्यापासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात उद्यापासून ( दि.१९ जून) ३० ते ४४…
-
दिव्यांगाबाबत जनजागृतीसाठी कल्याण ते गोवा सायकल प्रवास
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - अपघातात हातपाय गमवणाऱ्या किंवा जन्मापासूनच दिव्यांग असणाऱ्या…
-
पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - पत्रकारांच्या न्याय्य…
-
७ ते १४ नोव्हेंबरदरम्यान विधि सेवा सप्ताहाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतभर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
-
ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील२८.५ फूट उंच फ्लेमिंगो शिल्पाकृती बेस्ट ऑफ इंडिया राष्ट्रीय विक्रमाची मानकरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - स्वच्छतेमध्ये नेहमीच मानांकन…
-
भरड धान्याबाबत जनजागृतीसाठी इंडिया टुरिझमचा विशेष उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने …
-
5G च्या जलद कार्यान्वयनासाठी 'राईट ऑफ वे' नियमांमध्ये सुधारणा
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी- केंद्रीय दूरसंवाद मंत्री अश्विनी…
-
१० ते १५ जूनदरम्यान मान्सूनचे विदर्भात होणार आगमन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - उष्णतेच्या लाटेमुळे देशातील…
-
क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते राजस्थानमध्ये खेलो इंडिया केंद्रांचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - जयपूर…
-
इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेतर्फे ‘फिन्क्लूव्हेशन’उपक्रमाची सुरुवात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा 75 …
-
ठाणे येथे बॅडमिंटन खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - खेलो इंडिया सेंटर्स उभारणीच्या पहिल्या…
-
भारताचा स्वातंत्र्यलढा १७५७ ते १९४७ या कालावधीतील प्रदर्शनाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील…
-
२० ते २१ तारखेपर्येंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल - आमदार बच्चू कडू
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - काल सत्ता संघर्षाचा निकाल…
-
डहाणूकरवाडी ते दहिसर पूर्व अतिरिक्त मेट्रो सेवेचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी…
-
इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्याचा निर्णय अजून झालेला नाही - राजू शेट्टी
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर / प्रतिनिधी - महाराष्ट्रात सध्या…
-
भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाकडून ‘क्रॉनिकल्स ऑफ टाईमलेस ट्रेझर्स’चे सादरीकरण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नॅशनल फिल्म…
-
नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये १८ ते १९ हजार पक्षांचे आगमन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील पहिले रामसर…
-
ओप्पो इंडिया कंपनीची ४३८९ कोटीची कर चोरी उघड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - डीआरआय अर्थात केंद्रीय…
-
खेलो इंडिया युथ गेम्, महाराष्ट्राला बॅडमिंटन मध्ये पहिला विजय
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पंचकुला/हरियाणा- येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया…
-
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान फ्रान्स दौऱ्यावर रवाना
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.. नवी दिल्ली/प्रतिनिधी - चीफ ऑफ…
-
केमिस्ट्री ऑफ सिमेंटवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे यजमानपद भारताकडे
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - इंटरनॅशनल…
-
खेलो इंडिया युथ गेम्स,महाराष्ट्राला गतकामध्ये पहिले कांस्य पदक
नेशन न्यूज मराठी टीम. पंचकुला/ (हरियाणा)- येथे सुरु असलेल्या खेलो…
-
मुंबईत २२ ते २८ डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
मुंबई/प्रतिनिधी - विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 22 डिसेंबर ते २८…
-
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात २५ जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कोकणातील मुंबईसह रायगड, पालघर, ठाणे,…
-
महाराष्ट्र भूषण पूरस्कार सोहळ्यात उष्माघाताने ८ ते १० श्री सदस्यांचा मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. नवी /मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई येथील…
-
महाराष्ट्राला ऊर्जा श्रेणीमध्ये ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच अवॉर्ड’ जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ‘स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट’…
-
आता पुण्यात स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो रेल्वे होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पुणे महानगर मेट्रो रेल्वे…
-
१५ डिसेंबर पर्येंत केडीएमसी क्षेत्रातील पहिली ते सातवीच्या शाळा राहणार बंद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्य शासनाने पहिली ते सातवीच्या शाळा १…
-
२५ जुलैला पहिली खेलो इंडिया महिला तलवारबाजी लीग स्पर्धा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/रीया सिंग - नवी दिल्ली…
-
१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ रोजी मतदार जागृती अभियान
मुंबई/प्रतिनिधी - महानगरपालिका आणि स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदार नोंदणी मोठ्या…
-
मोहने ते कांबा पुलाच्या रस्त्याला साडे तीन कोटीचा निधी
कल्याण/ प्रतिनिधी- कल्याण आणि उल्हासनगर शहरा बरोबर कल्याण ग्रामीण भागातील…
-
३१ ऑगस्टपर्यंत कोकण किनारपट्टीवरील वॉटर स्पोर्ट्स, किल्ला प्रवासी होडी वाहतूक बंद
नेशन न्यूज मराठी टीम. अलिबाग - कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग मधील…
-
खेलो इंडिया युथ गेम्स महाराष्ट्राला दोन सुवर्णसह १० पदके
नेशन न्यूज मराठी टीम. पंचकुला - खेलो इंडिया स्पर्धेत आज…
-
पत्रकार कुणाल म्हात्रे यांना रोटरी क्लब ऑफ कल्याणचे मानद सदस्यत्व प्रदान
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील पत्रकार कुणाल म्हात्रे यांना कल्याण…
-
महाराष्ट्राला ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय…