नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली – भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा तुर्कीमधले आपले प्रशिक्षण केंद्र बदलणार असून आता आणि गुरुवारी 26 मे रोजी नीरज फिनलंडला प्रशिक्षणासाठी जाणार आहे.
सुवणर्पदक विजेता नीरज सध्या तुर्कीच्या ग्लोरिया स्पोर्ट्स एरिना येथे प्रशिक्षण घेत आहे. यानंतर तो २६ मे ते २२ जूनपर्यंत फिनलंडच्या कुओर्टाने ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणार आहे . कुओर्टाने ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रामध्ये खेळाडूंसाठी ऑलिम्पिक-स्तरीय इनडोअर आणि आउटडोअर सुविधा दिल्या जातात. सध्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता देवेंद्र झाझरिया हाही याच प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहे.
कुओर्टाने येथून नीरज नंतर पावो नुर्मी क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तुर्कूला रवाना होणार आहे. त्यानंतर कुओर्टाने येथील कुओर्टाने स्पर्धा आणि त्यानंतर स्टॉकहोममधील डायमंड लीगमध्ये तो भाग घेणार आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय) ने नीरज आणि त्याच्या संघाला फिनलंडमध्ये राहताना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही याची खात्री करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधला आहे; त्याला मंत्रालयानेही प्रतिसाद दिला असून नीरजला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन एसएआयला दिले आहे. हेलसिंकी येथील भारतीय दूतावासाकडून नीरजला आवश्यकतेप्रमाणे सर्व प्रकारची मदत मिळेल, असे सांगितले आहे.