नेशन न्यूज मराठी टीम.
बीड/प्रतिनिधी – बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाळुंज येथे एका आदिवासी पारधी समाजाच्या महिलेची जमिनीच्या वादातून धिंड काढण्यात आली होती, या संतापजनक घटनेवर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रा. किसन चव्हाण यांनी म्हटले आहे की, ज्या जमिनीवरून वाद झाला आहे ती जमीन त्या आदिवासी महिलेचे कुटुंब गेली ४० वर्ष कसत आहे. त्या जमिनीवर आपला ताबा घेण्यासाठी तिथले विद्यमान आमदार सुरेश धस यांच्या पत्नी गावगुंडांना सोबत घेऊन तिथे गेल्या दादागिरी केली आणि त्या गुंडांनी सदर आदिवासी महिलेला विवस्त्र केलं याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला.
आज आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी पीडित कुटुंबाला भेटलो आणि पीडित कुटुंबाला भेटल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो परंतू, डीवायएसपी भेटले नाहीत, पोलीस निरीक्षक भेटले नाहीत. त्या भागात आमदार सुरेश धस यांची प्रचंड दादागिरी आहे. त्यांनी अनेकांच्या जमिनी त्यांनी बेकायदेशीर बळकावल्या आहेत आणि म्हणून एकही अधिकारी जर भेटत नसेल तर हा सगळा प्रकार उद्विग्न आणणारा आहे.असे प्रा. किसन चव्हाण यांनी सांगितले.
आमचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांना ह्या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर त्यांनी जाहीर केलं आहे की, येत्या २८ ऑक्टोबरला ज्या अधिकाऱ्यांकडे तपास आहे, डीवायएसपी यांच्याकडे हा तपास आहे, जर ते भेटत नसतील तर त्या डिवायएसपीच्या कार्यालयाला आष्टी येथे जाऊन टाळ ठोकणार अशी घोषणा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
सरकारी कर्मचारी असून सरकारी कर्मचाऱ्यासारखं वागत नाहीत तर विद्यमान आमदार सुरेश धस यांच्या घराचे सालगडी असल्यासारखे ते वागतात म्हणून त्या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर २८ तारखेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्या कार्यालयाला टाळ ठोकणार आहेत. अस देखील प्रा. किसन चव्हाण यांनी म्हटले आहे.