महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image अर्थसत्ता लोकप्रिय बातम्या

पीएनबी बँक घोटाळ्याचे बीड कनेक्शन,साखर कारखान्याच्या चेअरमनची सीबीआयकडून चौकशी

नेशन न्यूज मराठी टीम.

बीड/प्रतिनिधी – देशात गाजलेल्या पीएनबी बँक घोटाळ्याचे धागेदोरे बीड पर्यंत पोहोचले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर गुरुवारी सीबीआयने धारूर तालुक्यातील शिवपार्वती साखर कारखान्याची चौकशी केली.

काही दिवसांपूर्वी दाखल झालेल्या पीएनबी घोटाळ्यातील गुन्ह्याचा तपास सीबीआय करीत आहे. याच बँकेकडून शिवपार्वती साखर कारखान्याला 100 कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आले. पुरेसे तारण नसतानाही हे कर्ज दिले कसे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सर्व प्रकरणानंतर शिवपार्वती साखर कारखान्याचे चेअरमन सोळंके यांनी माध्यमांना माहिती दिलीय.

पुण्यातील जीएस जमादार या व्यक्तीच्या माध्यमातून मुंबईतील डॉक्टर नंदकुमार तासगावकर यांची ओळख झाली. त्यांनी पैसे देण्यास होकार दिला. त्या नंतर शंभर रुपयांच्या बॉण्डवर स्वाक्षरी घेतली. आणि यांनीच बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगणमत करून शंभर कोटींचं कर्ज घेतले त्यातील 98 कोटी रुपये परस्पर उचलले आहे. त्यांच्या विरोधात कारवाई करावी, यासाठी न्यायालयात प्रकरण दाखल आहे. शिवाय पोलीस ठाण्यातही तक्रार दिली असल्याचं शिवपार्वती साखर कारखान्याचे चेअरमन सोळंके यांनी सांगितले.हा जो घोटाळा केला आहेयाची योग्य चोकशी करून दोषींवर कारवाई करावी आशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×