महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
लोकप्रिय बातम्या शिक्षण

प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांनी दहावीत मिळवले घवघवीत यश

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – कालच दहावीचा (Ssc board) निकाल लागल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज्यातील १४ लाख ८४ हजार विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाले. काही विद्यार्थ्यांनी शिकवनी न लावता मेहनत, चिकाटीच्या जोरावर दहावीत चांगले गुण संपादन केले. समाजामध्ये दोन परस्परविरोधी कौटुंबिक परिस्थिती पाहायला मिळते. एका ठिकाणी पालकांकडून आपल्या मुलांना यशस्वी होण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. तर दुसरीकडचे चित्र मात्र वेगळे असते. प्रतिकूल परिस्थितीतही काही विद्यार्थी हार न मानता जिद्दीने आपल्या स्वप्नांना साकारण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकतात.

आज एकीकडे कल्याणची (Kalyan) स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना दुसरीकडे मात्र गाव पाडे आहेत. जिकडे आता कुठेतरी शिक्षणाचा प्रसार होऊ लागला आहे. यापैकी एक कल्याण पश्चिमेच्या उंबर्डे येथील पाणबुडे नगर नावाचा आदिवासी पाडा आहे. कालचा दिवस या आदिवासी वस्तीसाठी दसरा आणि दिवाळीपेक्षा कमी महत्त्वाचा नव्हता. कारण या पाड्यात राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली. कल्याणातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या दशकभरापासून अनुबंध संस्था कार्यरत आहे. या संस्थेने कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा वेचक कुटुंबांतील मुलांसोबतच आदिवासी पाड्यांवरील मुलांनाही शिक्षणाद्वारे मुख्य प्रवाहात आणण्याचा विडा उचलला आहे. अनुबंध संस्थेच्या याच प्रयत्नांना आता यश येताना दिसत आहे. पाणबुडे नगर या आदिवासी वस्तीतील तनिषा वाघे, संदीप वाघे आणि रणवीर वाघे या तिघा विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले आहेत. अनुबंध संस्थेच्या प्रमुख मीनल सोहनी मॅडम, सूर्यकांत कोळी आणि प्रभाकर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली हे तिघे दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

कल्याणातील नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या महेरचे कौतुक करावे तेवढे कमीच ठरेल. महेरने कोणताही
क्लास न लावता केवळ सेल्फ स्टडी आणि शाळेतील शिक्षकांच्या सहकार्याने दहावी परीक्षेत तब्बल 90.20 टक्के गुण मिळवले आहेत. महेरच्या वडिलांचा कल्याण पश्चिमेत छोटासा गादी (Matress) कारखाना असून त्याद्वारे ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. तर तिची आई सलमा ही गृहिणी असून या दोघांनीही महेरला शिक्षणासाठी नेहमीच पाठींबा दिला आहे.
मोठं झाल्यावर आपल्याला डॉक्टर व्हायचे असून त्यासाठी आपण सायन्समध्ये प्रवेश घेणार असल्याचे महेरने सांगितले. तर अभ्यासात आपल्याला काही अडचण आल्यास आपण ऑनलाईन माध्यमांतून त्याचे उत्तर शोधले. मात्र बहुतांशी अभ्यास आपण शाळेतूनच केल्याचे सांगत नसरीन आणि शिवा टीचर या दोघांनी आपल्याला खूप चांगले सहकार्य केल्याचे महेरने सांगितले. छोटासा गादी कारखाना असलेल्या कुटुंबातील महेर असो किंवा आदिवासी पाड्यातील तनिषा,संदीप, रणवीर हे तिघे असो. या सर्वांनी दाखवून दिलं आहे की मनामध्ये पुढे जायची जिद्द असेल तर कितीही कठीण परिस्थिती असली तरी ती तुमच्यापुढे हात टेकणारच.

Translate »
×