नेशन न्यूज मराठी टीम.
औरंगाबाद / प्रतिनिधी – अमोल खरात हा बार्टीच्या संशोधक लढ्यातील झुंजार युवा नेता होता. तो आकस्मिकरित्या काळाच्या पडद्याआड गेला आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर फेलोशिपसाठी चार महिन्यांपूर्वी शेकडो संशोधक विद्यार्थ्यांनी केलेले ते आंदोलन दीड महिन्याच्यावर चालले होते. राज्यातून आलेले विद्यार्थी उपासमार सोसत रोज आझाद मैदानात येऊन लढत होते. ते सारे जण रोहित वेमुलाच्या पुरोगामी महाराष्ट्रातील आवृत्याच होत्या. बार्टी संशोधक विद्यार्थी कृती समितीचा हा लढा शैक्षणिक हक्कासाठी केलेल्या लढा होता. त्यांचे नेतृत्व हा सत्यशोधक विद्यार्थी आंदोलनाचा सच्चा कार्यकर्ता करत होता.
८६१ संशोधकांच्या लढ्यात अमोल सक्रिय सहभागी झाला होता. अखेर ती लढाई ५३ दिवसानंतर जिंकली! त्यातील अमोल खरात याचा अग्रस्थानावरील सहभाग कायम स्मरणात राहील. या युवा नेत्याला भावपूर्ण आदरांजली वाहताना सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते हळहळ व्यक्त करत आहेत. अश्या झुंजार कार्यकर्त्याच्या महागड्या वैद्यकीय मदतीसाठी समाज बांधव पुढे येण्याची गरज आहे. असे कार्यकर्त्ये हे चळवळीसाठी महत्वाचे असून त्यांनी व समाजाने आपल्या चळवळी सोबत आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात समाजिक हितासाठी आपल्या वैयक्तिक खाजगी आयुष्याची पर्वा न करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी वैद्यकीय विमा काढणे, त्यांच्या रोजगाराची तजवीज करण्यासाठी आर्थिक चळवळ उभी करणे गरजेचे आहे. विविध माध्यमातून लढवय्या अमोलला अखेरचा जय भीम म्हणून निरोप दिला जात आहे.