महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ताज्या घडामोडी पर्यावरण

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी बाप्पा कोकणातून थेट अमेरिकेत रवाना

नेशन न्यूज मराठी टीम.

रत्नागिरी / प्रतिनिधी – आकाश कंदीलांच्या माध्यमातून अमेरिकेसारख्या प्रगत देशात आपल्या कलाकारीचा नमुना पेश करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील केळंबे गावचे सुपुत्र निलेश सुवारे यांनी यावर्षी चक्क १०१ गणेश मूर्ती या अमेरिकेला पाठवल्या आहेत. तालुक्यातून अशा प्रकारे अमेरिकेला गणपती मूर्ती जाण्याची ही पहिलीच वेळ असून निलेश सुवारे या कलाकाराच्या जिद्द आणि कामगिरीचे कौतुक होत आहे.

नीलेश यांचे कलाकौशल्य पाहून अमेरिकेतून त्यांच्याकडील गणेशमूर्तींना मागणी आली आहे.त्यामुळे यावर्षी पर्यावरणपूरक १०१ गणपती मूर्ती पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पर्यावरणपूरक मूर्ती कागदी लगदा आणि मातीपासून बनवल्या गेल्या. गणपतीची मूर्ती व इतर वस्तू या वजनाने हलक्या, टिकाऊ असून अमेरिकेत पाठवण्यासाठी सुरक्षितही आहेत.गणपतींच्या मूर्ती अमेरिकेत पाठवणे, हे मोठे आव्हान असल्याने त्या विशेष पद्धतीने संरक्षित करून पाठवल्या गेल्या आहेत.

लांजा तालुक्यातील केळंबे येथील निलेश सुवारे या कलाकारने यापूर्वी आकाश कंदील अमेरिकेला पाठवून अमेरीकेच्या व्हाइट हाउसवर आपला कंदील लावण्याची इच्छा दाखविली होती. या दृष्टीने वर्षभर कंदील प्रोडक्शन करून ते अमेरीकेत व इतर ठिकाणी वितरीत होत आहेत. दरवर्षी काहीतरी नवीन करण्याच्या इराद्यामुळेच यावर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १०१ गणपती मूर्ती अमेरिका येथे पाठविण्याचा मनोदय केला होता. त्यानुसार ट्रायलबेसवर १०१ गणपती मुर्त्या अमेरिकेला पाठविल्या आहेत. यामध्ये अनेक टेक्निकल अडचणी आल्या होत्या मात्र बाप्पांच्या कृपेने यातून मार्ग निघून सदर मुर्ती यशस्वीपणे अमेरीकेत दाखल झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×