नेशन न्यूज मराठी टीम.
रत्नागिरी / प्रतिनिधी – कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मुंबईतील असलेला चाकरमानी म्हणजे प्रवासी हा या सणासाठी कोकणामध्ये येण्यासाठी खूप उत्सुक असतो या प्रवासामध्ये बहुतेक चाकरमानी रेल्वेचा प्रवास अवलंबतात. एकीकडे चाकरमान्यांचा प्रवास होत असताना दुसरीकडे गणपती बाप्पाही रेल्वेने प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे.
काही हौशी भाविक रत्नागिरीतून सुबक मुर्ती आपापल्या गावांमध्ये घेऊन जात असताना मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था बघता कोकण रेल्वेने प्रवास करून बाप्पांना आपल्या घरी विराजमान करतात हे करत असताना रेल्वे प्रशासनाचेही सहकार्य मिळत असते असे भाविकांमधून सांगितले जात आहे.