नेशन न्यूज मराठी टीम.
जालना/प्रतिनिधी – जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात मागील एक ते दीड महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी खरीपात पेरलेली सोयाबीन ,मका, तूर या पिकांचे पावसाअभावी हाल होत आहेत. पिकांबद्दल शेतकरी वारंवार कृषी विभागाला कळवत असून सुद्धा याकडे कोणीच लक्ष देत नाही.
जालना जिल्ह्याचे कर्ताधर्ता म्हणून पालकमंत्री यांनी या गोष्टीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज होती तसेच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा या बाबीकडे लक्ष द्यायची गरज होती मात्र शेतकऱ्याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. या सर्व त्रासाला कंटाळून बरंजळा येथील शेतकरी नारायण लोखंडे यांनी चक्क जालना भोकरदन महामार्गावरील बरंजळा फाटा येथील गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कृषी मंत्री धनंजय मुंडे व पालकमंत्री अतुल सावे हरवल्याचे बॅनर लावले आहेत. बॅनर ना आसे लिहिले आहे की हे दोन्ही व्यक्ती कोणाला आढळल्यास त्यांनी मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.