मुंबई, दि. २९ – बँकांनी येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे. ज्या शेतकऱ्यांचे आधीचे पीककर्ज थकीत असेल, त्यांना राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनाही पीक कर्ज देण्यात यावे, त्यांचे थकीत पीक कर्ज भरण्याची हमी राज्य शासनाने कर्जमुक्ती योजनेतून घेतली आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी आज विविध बँकांना दिली.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय बँकर्स समितीची १४७ वी बैठक व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, मुख्य सचिव अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मनोज सौनिक, आशिषकुमार सिंह, विकास खारगे, आभा शुक्ला, एकनाथ डवले आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह केंद्र शासनाचे प्रतिनिधी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी, नाबार्डचे प्रतिनिधी, राज्यातील विविध बँकांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. एप्रिल २०२० अखेर ही योजना संपायला पाहिजे होती. पण कोरोनाच्या संकटामुळे काही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती बाकी राहिली आहे. बँकांनी आता येत्या खरीप हंगामासाठी या शेतकऱ्यांची खाती थकीत गृहीत न धरता त्यांनाही नवीन पीक कर्ज देणे गरजेचे आहे. या शेतकऱ्यांचे आधीचे थकीत कर्ज मुक्त करण्याची हमी राज्य शासन घेत आहे, असे ते म्हणाले. यंदाचा पावसाळा समाधानकारक असेल असा अंदाज आहे. कोरोनाच्या काळात शेतकरीही मोठ्या संकटात आला आहे. पुढील हंगामासाठी शेतकऱ्याला आपण सर्वांनी मिळून साथ देऊया. सर्वजण मिळून कोरोनाच्या संकटावर मात करुया, असे आवाहन त्यांनी केले.
कृषी मंत्री श्री. दादाजी भुसे म्हणाले की, मी नुकताच साधारण २५ जिल्ह्यांचा दौरा केला. शेतकऱ्यांना अत्यंत कमी प्रमाणात पीककर्ज वितरण झाले आहे. आता पावसाळा जवळ आल्याने शेतकऱ्याला लवकरात लवकर कसे पीककर्ज मिळेल हे बघावे लागेल. शेतकऱ्यांना थो़डीशी रक्कम मिळाली तरी ते कर्जासाठी सावकार किंवा इतर खासगी यंत्रणेकडे जाणार नाहीत. त्यामुळे बँकांनी पीककर्जाच्या वितरणाचा मुद्दा अग्रक्रमावर घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कोरोनामुळे सध्या बँकांमध्ये कमी प्रमाणात कर्मचारी कार्यरत आहेत. ही संख्या वाढणे गरजेचे आहे. त्याचबरोबर किसान क्रेडीट कार्डचे वितरण व्हावे, असे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम पुण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले. यावेळी डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, राज्यातील शेती ही हवामानावर आधारित असल्यामुळे अवकाळी पाऊस, महापूर, टंचाई अशा समस्यांना तोंड देत शेतकरी शेती करतात. सर्व बँकांनी शेतकऱ्यांप्रती मदतीची भूमिका ठेवून काम करावे. राज्यातील सहकारी बँका व जिल्हा बँका पीक कर्ज वाटपाची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करत आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांनीही सकारात्मक भूमिका ठेवून शेतकऱ्यांना विनासायास कर्जपुरवठा करावा, असे ते म्हणाले.
Related Posts
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
प्रतिनिधी. मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त…
-
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पीक कर्जाबाबत आढावा बैठक
नाशिक/प्रतिनिधी- कोरोना महामारीचा विचार करता शेतकऱ्यांना शेती कामांमध्ये कोणतीही अडचण येऊ…
-
गायरान जमिनीप्रश्नी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मुख्यमंत्री यांची भेट
नेशन न्यूज़ मराठी टीम. https://youtu.be/CwGTOclLDzI मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रात गायरान जमीन…
-
सोलापूरात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर जिल्ह्यात अनेक…
-
शेतकऱ्यांना एका क्लिकवर मिळणार रासायनिक खतांच्या साठ्याची माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - दरवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना रासायनिक…
-
राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी, लोकांच्या…
-
‘महायुवा ॲप’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- शासकीय योजना, रोजगार संधी आणि…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते किशोर दिवाळी अंकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन…
-
ई-पीक पाहणी’ आता राजस्थानात ‘ई- गिरदावरी’
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - राज्यातील महसूल आणि कृषी…
-
पपईचे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचे प्रयत्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील…
-
पहलवान साहेब जीवन चरित्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सर्कसपटू मल्ल…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा
मुंबई/प्रतिनिधी – दीपोत्सव, प्रकाश पर्व मंगलमय अशा दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव…
-
मुख्यमंत्री आलेल्या बिडकीन शहरामध्ये शिवसैनिकाकडून गोमुत्र शिंपडून शुद्धिकरण
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर…
-
आता शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकी मध्ये मतदान करता येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील…
-
वाढत्या उन्हाचा चटका,शेतकऱ्यांना बसतोय फटका
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - यंदा वाढत्या उन्हामुळे…
-
महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सोयीसुविधांची मुख्यमंत्री यांच्या कडून पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या…
-
निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्री याची सदिच्छा भेट
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक मुस्लिम संघटना उतरणार आंदोलनात
प्रतिनिधी. मुंबई - केंद्र सरकारने तीन कृषीविधेयक बिल पारित केले.…
-
बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई शहर व उपनगरात…
-
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांकडून मदत
प्रतिनिधी. मुंबई - सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांतर्फे कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘वन भवन’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - ‘वन भवन’ या वन…
-
मुख्यमंत्री यांच्या घरावर बिराड आंदोलनाचा अखिल भारतीय आदिवासी सेनेचा इशारा
https://youtu.be/-xm7AhvNkiE धुळे/प्रतिनिधी -दादर मध्य रेल्वे स्टेशनच १६ डिसेंबर पर्यंत डॉ.…
-
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या…
-
मार्ड पदाधिकाऱ्यांची विविध मागण्यांवर मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक
मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपल्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा…
-
नाशिक येथे खाजगी बस अपघाताच्या घटनास्थळी मुख्यमंत्री यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिक येथे आज पहाटे…
-
लालबाग सिलेंडर स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत
प्रतिनिधी. मुंबई - लालबाग परिसरातील साराभाई इमारत गॅस सिलेंडर स्फोट…
-
कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाखाची मदत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरात…
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढील आठवड्यात कल्याण-डोंबिवली दौरा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
महिला विकासाच्या योजनांसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष
मुंबई - महिलांच्या विकासाला बळ देण्याची आवश्यकता असून महिला विकासाच्या योजना…
-
बीकेसी येथे कोविड१९ रुग्णालयाच्या कामाची मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांची पाहणी
मुंबई - कोरोनाचा सामना करण्यासाठी चीनच्या वुहान शहारात उभारण्यात आलेल्या…
-
मुख्यमंत्री लोकांना वेगवेगळ्या भूलथापा देतात-अभिजीत बिचुकले
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/IIHvBNxcsWM?si=KAr4ix8YIh2aFaGj कल्याण/प्रतिनिधी - विनोदी स्वभाव,…
-
चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिवादन
मुंबई प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना अभिवादन
मुंबई/प्रतिनिधी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य…
-
२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची मानवंदना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते ई-पीक पाहणी मोबाईल ॲपचे ऑनलाईन लोकार्पण
मुंबई/प्रतिनिधी - येत्या स्वातंत्र्य दिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने…
-
शाहीर पियुषी भोसले हिचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते विशेष सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा/प्रतिनिधी - शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात अण्णासाहेब…
-
सुशासन नियमावलीचा मुख्यमंत्री यांच्या कडून आढावा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेऊन त्यांना…
-
छत्तीसगडचा आगामी मुख्यमंत्री हा आदिवासीच असेल - ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टिम. रायपूर/प्रतिनिधी - छत्तीसगडमध्ये आदिवासींची लोकसंख्या 32…
-
कृषीक्षेत्राला बँकांनी एक खिडकी योजनेद्वारे तातडीने वित्तपुरवठा करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - उद्योग क्षेत्रात ज्याप्रमाणे इज ऑफ डुईंग बिझीनेस अंतर्गत…
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वन्यजीव सप्ताह प्रदर्शनास भेट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या…
-
शासनाच्या निर्णयास भाविकांनी सहकार्य करावे- गृहमंत्री देशमुख
प्रतिनिधी. पंढरपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी साप्रंदायाची परंपरा अखंडीत…
-
मुख्यमंत्री शिंदे यांनी दत्तक घेतलेल्या गावात पाणी नाही-वैशाली दरेकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/Lg97bL8zzSg?si=Ve3rZiWbBGLeL-_i कल्याण/प्रतिनिधी - कल्याण लोकसभेच्या…
-
खरीप हंगामात किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे बँकांनी पीक कर्ज वाटप करण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन
प्रतिनिधी. बीड - कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर राष्ट्रीयकृत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी…
-
८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक नोंदणी
मुंबई/प्रतिनिधी - महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना…
-
पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करायाला हवा -मुख्यमंत्री
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी…