नेशन न्यूज मराठी टीम.
पुणे/प्रतिनिधी – मागील ५० दिवसांपासून बार्टीचे ८६१ संशोधक विद्यार्थी हक्काची फेलोशिप मिळण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. परंतु आजूनही प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी यांच्या मागणीला होकार दिला नाहीये. आंदोलनाचा दिनांक 12 एप्रिल रोजी निर्णायक दिवस असल्याने प्रशासनाने आंदोलन फोडण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी 10 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता अचानक ८६१ पैकी फक्त २०० जणांची निवड झाली आहे, ज्यांना फेलोशिप मिळेल असे सूचना पत्र जाहीर करण्यात आले. कागदपत्र पडताळणीसाठी दिनांक 11एप्रिल रोजी बार्टी कार्यालय, पुणे येथे त्वरित बोलाविले. जेणेकरून २०० जणांना फेलोशिप देऊन त्यांना ८६१ जणांच्या गटातून फोडून आंदोलन क्षीण होईल. विद्यार्थ्यांनी मात्र हे अन्यायकारक पत्र रद्द करण्याची मागणी केली. परंतु बार्टी प्रशासन त्यांची विनंती मान्य करत नव्हती.
अशा वेळी वंचित बहुजन युवा आघाडी, पुणेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत बार्टीचे संचालक मा. वारे यांची भेट घेतली. ज्या महामानवांनी बहुजन समाजास शिक्षण मिळावे यासाठी मोठा संघर्ष केला, त्याच महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती च्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चालणारे संशोधन केंद्र बाबासाहेबांच्याच लेकरांना त्यांच्या शिक्षण आणि फेलोशिप हक्कापासून नाकारण्याचे धोरण कदापि सहन केले जाणार नाही. तसेच या अनुसिचीत जाती आणि जमातींच्या विद्यार्थ्यांमध्ये दिशाभूल करणारे अचानक पत्र काढून आंदोलनात फुट पाडण्याचे कट कारस्थान न करण्याचे बार्टी संचालक यांना वंचित बहुजन युवा आघाडी कडून सूचित करण्यात आले.
यासाठी हे दिशाभूल करणारे सूचना पत्र स्थगित करण्याची मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जोर लावून केल्यानंतर दिशाभूल करण्याचे पत्र त्वरित रद्द करण्यात आले. आणि अनिश्चित कालावधीसाठी प्रक्रिया स्थगित केली व त्या संदर्भात पत्र बार्टी प्रशासन कार्यालयाकडून घेण्यात आले. तसेच दोनशे विद्यार्थ्यांनी आपल्या उर्वरित मित्रांसाठी जी भूमिका घेतली ती महत्त्वाची होती. याप्रसंगी सोमनाथ पानगावे, मंगेश कदम सचिव वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर, प्राध्यापक श्रीकांत जगताप सर सचिव वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.