नेशन न्यूज मराठी टीम.
बीड / प्रतिनिधी – महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप प्रत्यारोप, बेताल वक्तव्य , उत्तर सभा घेतल्या जात आहेत. अजित पवार गटाची बीडमध्ये सभा झाली. या सभेसाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. सभेतून बीड जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा होती.
परंतु या सभेत काही घोषणा न झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आला. सभेतून केवळ राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. बीडकरांच्या विकासाचा कोणताही प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे याचा निषेध करत बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आंदोलकांनी केळी वाटप केली.