प्रतिनिधी .
रायगड – रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील रानसई फार्म. आंबा बागायतदाराचे नाव असीब शहाबाजकर. आंब्याचे चांगले उत्पादन होऊनही करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने भलतचं संकट उभे राहिले. यावर मात करण्यासाठी कृषी अधिकारी क्रांती चौधरी-मोरे यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला, या ग्रुपचे नामकरण झाले “डायरेक्ट फ्रूट सप्लाय”.
या ग्रुप मध्ये त्यांनी स्थानिक शेतकरी आणि ग्राहक यांचा समावेश करून घेतला आणि मग सुरू झाला आंब्याचा ऑनलाइन व्हॉट्सअप ग्रुप द्वारे व्यवसाय. या ग्रुपवरच मागणी नोंदविली जाते. मागणीप्रमाणे वाशी, नवी मुंबई ,खारघर, बेलापूर, पनवेल या भागातील विविध हाऊसिंग सोसायट्यांमध्ये असलेल्या ग्राहकांपर्यंत आंब्याच्या पेट्या पोहोचविल्या जातात. आंबे पोहोचविताना सोशल डिस्टंन्सिंग, मास्क लावणे, सॅनिटायजर चा वापर हे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातात.
हे आंबे जसे आंबा बागायतदार असीब शहाबाजकर यांनी विक्रीस दिले, तसेच पाली येथील शेतकरी श्री. परांजपे यांनी 100 डझन आणि उरण येथील शेतकरी घनश्याम धर्मा पाटील यांनी 110 डझन आंबे या व्हॉटस्अप ग्रुपच्या माध्यमातून विक्रीसाठी दिले. आतापर्यंत या ग्रुपच्या माध्यमातून तब्बल 5हजार डझनापेक्षा जास्त आंबे विकण्यात आले आहेत.
सुरुवातीला काही डझन आंबे विकल्यानंतर या ग्रूपमधील डॉ.सतिश मोरे आणि अमोल मार्कंडे या सदस्यांनी सूचना केली की, आपण केलेल्या विक्रीतून एका डझनामागे फक्त दहा रुपये असे जमा करुन करोनाच्या या संकटात शासनाला मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला देवू या. या कल्पनेचा अधिक विस्तार झाला आणि या ग्रुपने आतापर्यंत झालेल्या आंबे विक्री झाल्यानंतर पहिले दहा हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी, नऊ हजार दोनशे रुपये जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीकरिता जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे जिल्हा कृषी अधिकारी श्री. पांडुरंग शेळके, श्री. विजयकुमार साळवे यांच्या हस्ते सुपूर्द केले. याचबरोबर बेलापूर महानगरपालिकेला औषधे-गोळ्या घेण्यासाठी दहा हजार रुपये, गरिबांना अन्न वाटप करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेला दहा हजार रुपये तर उरणमधील आदिवासींना बियाणे खरेदी करून देण्यासाठी मदत म्हणून पाच हजार रुपये दिले आहेत.
याच प्रकारे दुसरा आणखी एक व्हॉटस्अप ग्रुप तयार करण्यात आला. त्याचे नामकरण झाले “व्हेजिटेबल सप्लाय” ग्रुप. उरणमधील कंठवली आणि विंधने या गावातील बचतगटांनी तयार केलेल्या वस्तू आणि शेतकऱ्यांचा भाजीपाला यांच्या विक्रीसाठी एकत्रित काम सुरू झाले. साधारण दहा-बारा एप्रिल दरम्यान हा ग्रुप स्थापन करण्यात आला. या भाजीपाला ग्रुपबरोबरच कृषी विभागाच्या आत्मा’अंतर्गत तयार करण्यात आलेल्या महिला बचतगटांनाही समाविष्ट करून घेण्यात आले. या महिला बचतगटांनी तयार केलेल्या कुरडया, पापड्या, मसाले यांचीही विक्री या “व्हेजिटेबल सप्लाय” व्हॉटस्अप ग्रुपच्या माध्यमातून सुरू करण्यात आली. वाशी, नवी मुंबई, खारघर, बेलापूर, पनवेल या भागातील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये कुरडया, पापड्या, अंडी, मसाले, तुळशीचा पाला यासह वांगी, माठ, पालक, फ्लॉवर, टोमॅटो, मिरची, सिमला मिरची, मेथी अशा प्रकारच्या भाज्या विक्री होऊ लागल्या. सध्या रोज जवळपास 200 किलो 300 किलो भाजीपाला विक्री होत आहे.
हा भाजीपाला, आंबे पोहोचविण्यासाठी याच भागातील स्थानिक आदिवासींना उत्पन्न मिळावे यासाठी त्यांचाच टेम्पो भाड्याने घेण्यात आला आहे.
करोनाच्या संकटात सर्व जग सापडले आहे. मात्र आपल्या सर्वांचा अन्नदाता शेतकरी उपाशी मरू नये यासाठी मनापासून काम करणाऱ्या कृषी अधिकारी क्रांती चौधरी-मोरे यांनी दाखविलेली कल्पकता, उत्तम असे मनुष्यबळ व्यवस्थापन, सोशल मीडियाचा अचूक वापर, उत्तम जनसंपर्क निश्चितच कौतुकास्पद आहे आणि त्यांच्यासह त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या, मार्गदर्शन देणाऱ्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, उपविभागीय कृषी अधिकारी अर्चना नारनवर, विजयकुमार साळवे, क्रांती चौधरी-मोरे यांचे पती डॉ.सतिश मोरे आणि हा भाजीपाला, आंबे छोट्या टेम्पोने पोहोचविण्याचे काम करणारे तरुण शेतकरी सचिन खाणे, पुनित राठोड, राज मेहेकर आणि विविध हाऊसिंग सोसायट्यांमधील श्रीमती क्रांती चौधरी-मोरे यांच्या ग्राहक मैत्रिणी या सर्वांचे मिळालेले सहकार्य समाजाला प्रेरणादायक असेच आहे.
विशेष म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतरही हा उपक्रम असाच पुढे सुरु राहील, असा संकल्प या दोन्ही ग्रुपच्या सदस्यांनी केला आहे.
Related Posts
-
चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात कृषी पंपांचे दिवसभराचे भारनियमन रद्द
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया…
-
कृषी उन्नतीसाठी रत्न कृषी महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी - शेती हा भारतातील प्रमुख…
-
जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत,ग्लोबल शेतकरी कृषी प्रदर्शनचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत कृषी…
-
कृषी विभागाची एक महत्वपूर्ण योजना,कृषी यांत्रिकीकरण योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कृषी विभागाची एक महत्वपूर्ण…
-
भारतीय सिनेमा आणि भारताची सौम्यशक्ती या विषयावर ३ आणि ४ मे रोजी चर्चासत्र
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आयसीसीआर म्हणजेच सांस्कृतिक संबंधविषयक…
-
बीएमसीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महत्त्वाची स्थळे या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनी आज राज्यपाल…
-
लिंग समानता आणि दिव्यांग समावशेकता या विषयावर होणार राष्ट्रीय परिसंवाद
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - शहरी विकासामध्ये लिंग…
-
दिल्ली, शक्ती आणि किल्तन या भारतीय नौदलातील जहाजांचे सिंगापूर येथे आगमन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलातील…
-
प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, फार्मसी आणि कृषी शिक्षण या प्रवेशासाठी १० फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा…
-
कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आपल्या जिल्ह्याची शेती ही…
-
‘विज्ञान प्रगती’ या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या मासिकाला राजभाषा कीर्ती पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सीएसआयआर अर्थात वैज्ञानिक…
-
कृषी विभागामार्फत गावोगावी राबण्यात येणार बीजप्रक्रिया मोहीम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या…
-
कृषी केंद्रात बियाणांचा साठा अपुरा पडल्याने शेतकरी संतप्त
अकोला/प्रतिनिधी - पावसाळा सुरू व्हायला काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळेच…
-
कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी ३० टक्के राखीव- कृषी मंत्री
धुळे/प्रतिनिधी - कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी खंबीरपणे उभा राहिला. त्यांनी…
-
डोंबिवलीत वंचितच्या वतीने कृषी कायद्याविरोधात निदर्शने
प्रतिनिधी. डोंबिवली - शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी केंद्र सरकारने केलेले शेतकरी…
-
मुंबईत सुरत आणि 'उदयगिरी' या दोन स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकांचे जलावतरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्वदेशी युद्धनौका निर्मितीच्या इतिहासात…
-
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महापालिकेची धडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महापलिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवशी यांचे मागदर्शनाखालील क…
-
भारत कृषी महोत्सवात गजेंद्र रेडा ठरतोय आकर्षणाचा केंद्र बिंदू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - स्वर्गीय आमदार भारत…
-
जालना जिल्हात झळकले कृषी मंत्री व पालकमंत्री हरवल्याचे बॅनर
नेशन न्यूज मराठी टीम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात मागील…
-
कृषी संजीवनी सप्ताहात कृषीमंत्री थेट शेतकऱ्याच्या बांधावर
प्रतिनिधी. चंद्रपूर - जिल्ह्यात जास्तीत जास्त समृद्ध आणि प्रगतशील शेतकरी…
-
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - काही दिवसांपूर्वी नांदेड कृषी…
-
कृषी कर्ज मित्र योजना, शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध
मुंबई/प्रतिनिधी - इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध…
-
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती करणार कचऱ्यापासून खत निर्मिती
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज शेकडो गाड्या…
-
शेतकऱ्यांनी इतर खतांसोबत नॅनो युरियाचा वापर करावा; कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - चोपडा तालुक्यात…
-
राज्यातील ७० हजाराहून अधिक कृषी केंद्र चालकांचां बेमुदत बंदचा इशारा
नेशन मराठी ऑनलाइन टिम. जळगाव/प्रतिनिधी - कृषी केंद्र चालकांवर कठोर…
-
अमरावतीत कृषी कायद्या विरोधात राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन
प्रतिनिधी. अमरावती - सातबारा वाचवण्यासाठी आठ बाराचा बंद यशस्वी करा…
-
कृषी सेवक पद भरतीसाठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - कृषी आयुक्तालयाच्या…
-
राष्ट्रीय कृषी संमेलन- खरीप अभियान - २०२२ चे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली - कृषी मंत्री नरेंद्र…
-
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची फळे व धान्य महोत्सव अनुदान योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य कृषी पणन…
-
शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना कनेक्शन, महावितरणने ओलांडला लाखाचा टप्पा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज…
-
कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - उन्हाळ्याची सुरुवात झाली…
-
कृषी विज्ञान संकुल काष्टी येथील महाविद्यालय इमारतींच्या आराखड्याबाबत आढावा बैठक
मालेगाव प्रतिनिधी - कृषी विज्ञान संकुल हा नाविन्यपूर्ण प्रकल्प असून एकाच…
-
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागास ICCOA चा "जैविक इंडिया ॲवार्ड २०२३"
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - इंटरनॅशनल कॉम्पीटन्स…
-
कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्क सवलत; कृषिमंत्रीआणि कुलगुरूंची झाली बैठक
मुंबई/प्रतिनिधी- कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांनी…
-
बांबू पासून तयार केलेली पारंपारिक झोपडी ठरतेय कृषी प्रदर्शनातील आकर्षण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नंदुरबार/प्रतिनिधी - नंदुरबार शहरात खानदेश…
-
कृषि यांत्रिकीकरण योजनेत कृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा समावेश
मुंबई/प्रतिनिधी - कृषि विद्यापीठांनी विकसित केलेले कृषि यंत्र व अवजारांचे उत्पादन करण्यासाठी खाजगी…
-
टोळधाड किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून उपाययोजना जाहीर
प्रतिनिधी . अमरावती - अमरावती जिल्ह्यामध्ये टोळधाड या किडीचा प्रादुर्भाव…
-
३० नोव्हेंबरपर्यंत फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे कृषी विभागाकडून आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - येत्या आंबिया बहारामध्ये विविध…
-
पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे यासाठी कृषी आयुक्तांचे शेतकरी बांधवांना आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - कृषी विभागामार्फत…
-
टोळ धाड किडीची वेळीच उपाययोजना करा कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीचे आवाहन
प्रतिनिधी. चंद्रपूर - वाळवंटी टोळ ही जागतिक व आंतरराष्ट्रीय महत्वाची…
-
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आता किरकोळ विक्रीस मनाई
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील वाढत्या कोरोना साथीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण…
-
चंद्रपूर शेतकऱ्यांना पीक पद्धतीचे नियोजन करण्याचे जिल्हा कृषी विभागाचे आवाहन
प्रतिनिधी. चंद्रपूर - शेतकऱ्यांनी खरीप हंगामाला सुरुवात होत असताना केवळ…
-
कृषी विभागाच्या वैयक्तिक योजनांचा लाभ ५० टक्के महिला शेतकऱ्यांना
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर - कृषी विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या…
-
पुणे येथे १३ ते १५ मार्चला तांदूळ महोत्सव,नागरीकांना लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे- जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेला उच्च दर्जाचा…