नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव / प्रतिनिधी – जळगाव जिल्यातील चोपड्यात बहुजन समाज पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा हा समाजाच्या उपस्थित विविध मागण्यांसाठी करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ होऊन तहसील कार्यालयापर्यंत आणण्यात आला.
अनुसूचित जाती जमाती वर होणाऱ्या अन्याय अत्याचार बंद व्हावा, स्पर्धा परीक्षेचे ऑनलाईन शुल्क कमी करण्यात यावे ,ग्रामपंचायत नगर परिषद हद्दीतील अतिक्रम धारकांना पट्टे देऊन घरकुल मंजूर करण्यात यावे. यासह इतर मागण्यांचा समावेश ह्यात होता, ह्यासाठी या ठिकाणी घोषणा देण्यात आल्या व विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. सदर मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांमार्फत राज्यपालांपर्यंत पोहोविचण्यात यावे अशी मागणी केली गेली.