नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत असल्याने या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र ‘आजादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी राज्यातील ‘आजादी का अमृत महोत्सव’ कोअर समितीचे अध्यक्ष तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
या बैठकीस अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक, सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे, महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांची उपस्थिती होती. तसेच विविध विभागाचे सचिवही उपस्थित होते.
आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन 15 ऑगस्ट 2023 पर्यंत करण्यात येणार आहे. हा उपक्रम केंद्र शासनाने निश्चित केलेल्या प्रमुख पाच संकल्पनांच्या अनुषंगाने साजरा करण्यात येणार आहे, राज्यात या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाने या उपक्रमाच्या संकल्पनेस मान्यता देऊन निधीची तरतूदही केली आहे. राज्याच्या विविध विभागांनी प्रत्येकी दोन या प्रमाणात आयकॉनिक कार्यक्रम घेण्याविषयी यावेळी चर्चा झाली. उपस्थित सर्व मंत्री यांनी आपल्या संकल्पना यावेळी मांडल्या.
राज्य शासनाच्या वतीने राज्याचा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात यावा अशी संकल्पनाही बैठकीत मांडण्यात आली. विविध विभागाने आजादी का अमृत महोत्सव यानिमित्त तयार केलेल्या नियोजनाचे सादरीकरण यावेळी