नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर/प्रतिनिधी – मणिपूर महिलांवर झालेल्या अत्याचाराच्याविरोधात आज आयटकचा मूक मोर्चा क्रांती चौक ते भडकल गेटपर्यंत काढण्यात आला. यावेळी अंगणवाडी कर्मचारी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी महिलांनी जोरदार निषेध नोंदवला. भिडे यांनी महिलांबद्दल वक्तव्य केले होते की माझ्या बागेतील आंबा जर महिलांनी खाल्ला तर त्यांना नक्कीच मुलेबाळे होतील हा सर्व महिलांचा अपमान आहे.
मणिपूर येथील महिलांना लग्न अवस्थेत त्यांची धिंड काढली त्या आरोपींना आजही सरकार पाठीशी घालत आहे. त्यांना शिक्षा करावी, अनेक फूलनदेवी होण्याची सरकारने वेळ नाही आणावी, यासाठी आम्ही आज मूक मोर्चा काढत आहोत, असे या महिला आंदोलकांनी सांगितले.