प्रतिनिधी.
सांगली – वैभवाच्या, अभिमानाच्या आणि स्वाभिमानाच्या अनेक खाणाखुणा मोठ्या अभिमानाने आपल्या अंगावरती मिरवणाऱ्या कुडनूर गावाने कुऱ्हाडबंदीचा निर्णय घेतला आहे. त्याचा प्रत्यक्ष फायदा गावाला झाल्याचे आज दिसून येत आहे. ग्रामस्थांनी एकत्रित येत गावात कोणत्याही वृक्षावर कुऱ्हाड चालवायची नाही. असा निश्चय केला आहे. तसेच वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी चंग बांधला आहे. त्यामुळेच गावात आज विविध प्रकारची झाडे मोठ्या दिमाखाने डोलत उभी आहेत…
गावात पार कट्ट्यावर असलेले लिंबाचे झाड कांही वर्षांपूर्वी जिर्ण होऊन पडले. ती गोष्ट ग्रामस्थांच्या फार जिव्हारी लागली. या झाडाशी गावचे एक वेगळ्या प्रकारचे नाते होते. झाडाला असलेल्या लांबचलांब मुळ्या जमिनीवर होत्या. त्यामुळे लहान मुलं त्या मुळ्यामध्ये आगिनगाडी किंवा रेल्वेगाडी करून खेळ खेळायचे… त्या मुळ्यामध्ये लपांडवही चालायचा, उन्हात लोक सावलीला थांबायचे, पावसाळ्यात पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेकजण त्याच झाडाखाली आश्रय घ्यायचे. थंडी – वाऱ्यातही लोक झाडाच्या निवार्याला थांबायचे… इतकच काय तर पंचमंडळी या झाडाच्या खाली असलेल्या आणि मुळ्यापासून तयार झालेल्या खुर्चीसारख्या आकाराच्या त्या खुर्चीवर बसून न्यायदानाचे पवित्र कार्यही करायचे. मात्र ते लिंबाचे झाड जिर्ण होऊन पडले… त्यामुळे त्या झाडासोबत असलेल्या अनेक आठवणीमुळे गावकरी शोकाकुल झाले होते. त्यानंतर लगेचच ग्रामस्थांनी त्याच जागी लिंबाचे दुसरे झाड लावण्याचा निर्णय घेतला आणि स्व. नामदेव पांढरे, जयकर कोळी व इतर ग्रामस्थांनी पुढाकार घेत त्याच जागी लिंबाचे दुसरे नविन झाड लावले. गावकऱ्यांनी या झाडाला पोटच्या पोराप्रमाणे जपले. आज हे झाड मोठे झाले असून पुन्हा एकदा या झाडाखाली सर्व ग्रामस्थ येऊन बस – उठ करत आहेत. तर ग्रामपंचायतनेही या झाडाला आता कट्टा बांधला आहे. त्यामुळे हे झाड भक्कम झाले असून, झाडाला पाणी घालण्यापासून ते झाड वाढवण्याच्या दृष्टीने योग्य ती सर्व प्रकारची काळजी ग्रामस्थ घेत आहेत. परिणामी गावचे गेलेले सौंदर्य आणि गतवैभव पुन्हा एकदा परत मिळाले आहे.
दुसऱ्या बाजूला गावात गावच्या प्रवेशद्वारावरतीच दोन चिंचेची भली मोठी झाडे होती. या चिंचेच्या झाडाला लोक पंचमीच्यावेळी झोपाळा बांधत, कालिदास सुतार, कृष्णदेव सुतार, दीपक कोळी त्यासाठी पुढाकार घेत… एरव्ही या झाडाखाली लोक सावलीला थांबत, ऊन – वारा पाऊस यापासून स्व. संरक्षण करण्यासाठी या चिंचेच्या झाडाचा सहारा घेत. या झाडांचे वैशिष्ट्ये म्हणजे ही दोन्ही झाडे एकाच उंचीची आणि एकसारखी वाढली होती. त्यामुळे ती दिसायला हुबेहूब होती. म्हणून तर ग्रामस्थ त्यांना जोड चिंच म्हणत… या जोड चिंचेच्या मधून बैलगाडी जाण्यासाठी रस्ता होता. किंबहुना याच रस्त्याने डफळापुरला जाता येत होते. पावसाळ्यात, उन्हाळ्यात, हिवाळ्यात गावात अनेक प्रकारचे निसर्गातील पाहुणे येत. वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे, प्रजातीचे पक्षी, माकड या झाडावर पाहायला मिळायचे…मात्र दुर्दैवाने सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही दोन्ही झाडी एकाच वेळेस पडली. आणि गावकरी पुन्हा एकदा हळहळले… त्यामुळे या झाडांची कसर भरून काढण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत पुन्हा एकदा या झाडांची आठवण म्हणून तशाच प्रकारची झाडे लावण्याचा निश्चय केला आणि त्याच परिसरात वडाचे झाड लावले. सांगलीहून सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ पांढरे यांनी हे झाड आणले. त्यानंतर हे वडाचे झाड संभाजी पांढरे, शामराव हिप्परकर, सुभाष पांढरे, स्व. दादासाहेब सरगर, तत्कालीन उपसरपंच आणि विद्यमान सरपंच अमोल पांढरे, भास्कर कोळी, माजी सरपंच – सतीश पांढरे, अज्ञान पांढरे यांच्या पुढाकाराने लावण्यात आले. पुढे हे झाडं स्व. नामदेव पांढरे, जयकर कोळी, दादासाहेब पांढरे यांनी पाणी घालून वाढवले. आज या झाडाची पूजा अर्चा करण्यात गाव कुठेही कमी पडत नाही. वटपौर्णिमेदिवशी गावातील महिला मंडळी या झाडाची विशेष पूजाअर्चा करतात. या झाडाभोवती फेरे घेतात… आज हे झाड गावच्या सौंदर्यात मोलाची भर टाकत आहे. त्याशिवाय मरीआई मंदिराच्या परिसरातही स्व. नामदेव पांढरे आणि शामराव पांढरे यांनी पिंपळ व इतर वृक्षांची लागवड करून त्याचे जतन केले आहे. आज ही झाडंही मोठी झाली आहेत. आणि या झाडाच्या सावलीखालाही आज ग्रामस्थ बस उठ करत आहेत. आणि ही झाडेही मरीआई मंदिराचा परिसर सुशोभित करून मंदिराच्या सौंदर्यात भर टाकत आहेत. ग्रामपंचायत कार्यालयासमोर अशोक वृक्ष मोठ्या दिमाखाने डोलत आहे. तर प्राथमिक जिल्हा परिषद शाळेच्या अवरातही विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड केली आहे. विविध प्रकारची ही झाडे शहराच्या सौंदर्यात भर टाकत आहेत. शालेय विद्यार्थ्यांनी या झाडांना आपला सच्चा मित्र मानला असून, या झाडांची ते निगा राखत आहेत. त्यामुळे ही झाडे आज शाळेची एक प्रकारची ओळख बनली आहेत. तसेच रामचंद्र पाटील यांच्या घराच्या पाठीमागे असलेले चिंचेचे झाडही ग्रामस्थांनी मोठ्या प्रेमाने जोपासले आहे. या चिंचेच्या झाडाच्या गर्द सावलीत आज ग्रामस्थ आणि वाटसरू विश्रांती घेतात. हे पाहून मनअगदी भारावून जात. गावातील इतर ग्रामस्थांनीही आपल्या दारात अनेक झाडांचे संगोपन केले आहे. नायकू सुतार यांच्या दारात फुलांची, फळांची झाडे पाहायला मिळतात. तर आनंदा सरगर, विलास व्हनमाने, सुभाष कदम, तानाजी माने, जगन्नाथ मलमे, पिंटू मलमे, राजू सोलंकर, संजय आठवले, शांताराम आठवले आणि इतर सर्वच ग्रामस्थांच्या दारात उभी असलेली नारळ, लिंब, चिंच आदी झाडे ग्रामस्थांचे झाडावरील आपले प्रेम, माया, ममता आपुलकी आणि जिव्हाळा याची प्रचिती देत आहेत.
अनिल पाटील ,बाळासाहेब मासाळ, सतीश पांढरे सरपंच मा. श्री. अमोल पांढरे यांच्या प्रयत्नातून मायक्का मंदिर परिसरातही वृक्ष लागवड करून ती जतन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच गावात आणखी झाडे लावण्याचाही प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे एकूणच कुऱ्हाडबंदीचा घेतलेला निर्णय आज सर्व ग्रामस्थांसाठी अभिमानाचा विषय बनला आहे.
तर या संदर्भात बोलताना, सरपंच अमोल पांढरे म्हणाले की कुडणूर – शिंगणापूर रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे आता हळूहळू मोठी होत आहेत. त्याप्रमाणेच कुडणूर – डफळापुर आणि कुडणूर – कोकळे या मार्गावरही रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच वृक्ष लागवडीसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले आहे. त्या सर्वांचे त्यांनी अभिनंदनही केले आहे.
Related Posts
-
दुर्दैवाने सत्तेत असलेल्या निजामी मराठ्यांनी रयतेच्या मराठ्यांचा विचारच केला नाही - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज़ मराठी टिम. अकोला/प्रतिनिधी - दुर्दैवाने सत्तेत असलेल्या निजामी…
-
शिवाजी महाराजांनी स्वराज्यात कधी भेदभाव केला नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमते विरोधात लढा दिला- डॉ. श्रीमंत कोकाटे
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- इंग्रजी सोपी भाषा आहे. इंग्रजी…
-
चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ३१ लाखाचा गांजा केला जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - लोकशाहीच्या सर्वात मोठ्या…
-
२९ ग्रामपंचायतीनी एकाच दिवशी केला विधवा प्रथेविरुद्ध ठराव
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट…
-
या दोन गावात एकही गावकरी गणपती घरी आणत नाही
कल्याण ग्रामीण - राज्यात,देशात किवा परदेशात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा…
-
पत्नीनेच प्रियकरामार्फत केला नवऱ्याच्या खून, २४ तासात पोलिसांनी ५ आरोपींना केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर शहरातील…
-
भारतीय लष्कराने साजरा केला ७६ वा पायदळ दिवस
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय लष्कराचा सगळ्यात…
-
देशातील कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाने केला २०६.८८कोटीचा टप्पा पार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - आज सकाळी सात…
-
लातूरच्या १४ गावात ३० किलोमीटर भागात २८ हजार महावृक्ष लागवड
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर/प्रतिनिधी - मानवाने आपल्या प्रगतीसाठी दिसेल…
-
तीन आठवड्यात ४२ हजार थकाबाकीदारांना महावितरणचा झटका, वीजपुरवठा केला खंडित
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण परिमंडलात गेल्या तीन आठवड्यात वीजबिल थकबाकीपोटी जवळपास ४२ हजार…
-
कल्याणात कचोरे गावात घरगुती सिलेंडरचा स्फोट
प्रतिनिधी. कल्याण - ठाकुर्ली मार्गावर असणाऱ्या कचोरे गावातील टेकडीवर असणाऱ्या…
-
उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे फडकवत आमदार अपात्रता निकालाचा केला निषेध
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - आमदार अपात्रता प्रकरणाचा…
-
अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना त्यांच्या गावात अथवा रहिवासी ठिकाणी येण्यास मज्जाव करू नये - जिल्हाधिकारी राहुल रेखावार
प्रतिनिधी . बीड दि.२२ - जिल्ह्यातील नागरीकांनी पेट्रोल पंपावर काम…
-
कल्याणच्या गावात वासूदेवांमार्फत मतदान जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/9C6Hl1EzVyI?si=Aakzdu0WxecI_CZ5 कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक…
-
माय माऊलीच्या जन्माचा उत्सव अनवणी पायांना आधार देऊन केला साजरा
सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर शहर पोलीस शिपाई शांतीसागर जेनुरे यांनी आपल्या…
-
भारताच्या कोविड -१९ प्रतिबंधक लसीकरणाने १९१.९६ कोटीचा टप्पा केला पार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 191.96 (1,91,96,32,518) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,41,17,166 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे. देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.24 (3,24,75,018) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्यास प्रारंभ झाला आहे.…
-
कल्याणच्या चिमुरड्यांनी मलंगगड केला सर
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - सह्याद्री रॉक एडव्हेंचर गिर्यारोहक समूहाच्या सहकार्याने तिघा चिमुकल्यांनी कल्याणनजीक…
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी शिवसेना रस्त्यावर कर्नाटक सरकारचा केला निषेध
प्रतिनिधी. कल्याण - बेळगाव जिल्ह्यातील निपाणी जवळ असलेल्या मनगुत्ती गावात…
-
महाविकास आघाडी सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला- केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची टीका
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - पेट्रोल डीझेलची दर वाढ…
-
सौंदाना गावात दिडशे एकर ऊस जळून खाक
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - सौंदाना गावात अचानक लागलेल्या…
-
आरईसीने गुंतवणूकदारांसाठी 'सुगम आरईसी'मोबाईल ॲपचा केला आरंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आरईसी लिमिटेड, महारत्न…
-
पोलिसांनी रेझिंग डेचे औचित्य साधून,६५ लाख रुपयांची रोकड आणि मुद्देमाल केला परत
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पोलीस परिमंडळ -३ मध्ये येणाऱ्या सात…
-
सोसाट्याच्या वाऱ्याने केळी पिकाचा केला घात
जळगाव/प्रतिनिधी - अवकाळी पडणारा पाऊस आणि वाऱ्यामुळे राज्यातील शेतकरी…
-
शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मशाल निशाणीचे चिन्ह मिळताच कल्याणातील शिवसैनिकांनी केला जल्लोष
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- शिवसेनेच्या उद्भव ठाकरे गटाला निवडणूक…
-
कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेडया, साडे चार लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - कल्याण कोळशेवाडी पोलीसानी एका…
-
डोंबिवलीत मोलकरणीने केला पाच लाखाचा ऐवज लंपास
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीत घरात काम…
-
ऑनलाईन गंडा घालणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी केला पर्दाफाश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - साक्री तालुक्यातील दहिवेलच्या…
-
मोदींनी महाराष्ट्रातून धनुष्यबाण केला गायब, संजय राऊतांचा बीजेपीवर हल्लाबोल
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. सांगली /प्रतिनिधी - लोकसभा निवडणूक…
-
कल्याण मध्ये कर्नाटकातील विजयाचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/CneZW-zUCdE कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कर्नाटकात काँग्रेस…
-
कल्याणात जनजागरण यात्रा काढून कॉग्रेसने केला केंद्र सरकारचा निषेध
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - आगामी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुका कोणत्याही…
-
कोव्हिड काळात भ्रष्टाचारात शिवसेनेने जागतिक रेकॉर्ड केला, बीएमसीचा १०० कोटीचा घोटाळा उघड करणार-किरीट सोमय्या
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - भाजप नेते किरीट सोमैय्या काल डोंबिवलीत भाजपच्या…
-
कल्याण रनर्सच्या धावपटूंचा केडीएमसी आयुक्तांनी केला सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - २८ ऑगस्ट रोजी…
-
देश वाचवायचा असेल तर भाजप,आरएसएसच्या सत्तेचा पराभव केला पाहिजे - योगेंद्र यादव
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा/प्रतिनिधी - राष्ट्रीय संयोजक भारत जोडो…
-
राज ठाकरे यांनी नाशिकचा विकास केला म्हणुन उपमुख्यमंत्र्यांसाठी काही शिल्लकच राहिलेलं नाही - सुधीर मुनगंटीवार यांचा टोला
नेशन न्यूज मराठी टीम. गोदिया/प्रतिनिधी - कर्नाटक निकालानंतर राजकीय पक्षामध्ये…
-
वस्त्रोद्योग मंत्रालयाने साजरा केला ‘जागतिक कापूस दिवस’
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - वस्त्रोद्योग मंत्रालयाने जागतिक…
-
पंढरपुरातील चिंचणी गाव सव्वा वर्षांनंतरही कोरोनामुक्त,आजपर्यंत एकही रुग्ण गावात सापडला नाही
पंढरपूर/प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गावागावात, वाड्या-वस्त्यावर कोरोनाने थैमान घातले असताना…
-
नवी मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाने १९.८४ कोटीचा बनावट जीएसटी घोटाळा केला उघड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी मुंबई - नवी मुंबईच्या सीजीएसटी…
-
मुख्यमंत्री शिंदे यांनी दत्तक घेतलेल्या गावात पाणी नाही-वैशाली दरेकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/Lg97bL8zzSg?si=Ve3rZiWbBGLeL-_i कल्याण/प्रतिनिधी - कल्याण लोकसभेच्या…
-
दक्षिण कमांड मुख्यालयाने साजरा केला १२८वा स्थापना दिवस
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - लष्कराच्या दक्षिण कमांड…
-
देशातील कोविड -१९ प्रतिबंधक लसीकरणाने पार केला १८६ .५१ कोटी मात्रांचा टप्पा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त…
-
किरीट सोमय्याचा गेम भाजपच्याच लोकांनी केला-सुषमा अंधारेंचा खळबळजनक दावा
नेशन न्यूज मराठी टिम. अमरावती/प्रतिनिधी - ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा…
-
कल्याणात सापडला बनावट निवडणूक ओळख पत्रांचा भंडार, आरोपीच्या पत्नीनेच केला भांडाफोड
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण शहरात एका फ्लॅटमध्ये भारत निवडणूक आयोगाकडून मिळणाऱ्या…
-
नौवहन महासंचालनालयाने ५९ वा राष्ट्रीय सागरी दिन केला साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - देशभर आज राष्ट्रीय सागरी…