महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
क्रिडा चर्चेची बातमी

कल्याण, टिटवाळ्यातील कराटे प्रशिक्षकांना आंतरराष्ट्रिय ब्लॅक बेल्ट प्रदान

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – कीमुरा शूकोकाई कराटे या जागतीक असोसिएशनच्या वतीने 11 जुलै ते 17 जुलै दरम्यान केप टाऊन, साऊथ आफ्रिका येथे जागतिक कराटे प्रशिक्षण आणि स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी टिटवाळा आणि कल्याण येथील 13 खेळाडू आणि प्रशिक्षक सहभागी झाले होते. त्यांपैकी 5 कराटे प्रशिक्षकांनी आंतरराष्ट्रिय स्तरावर स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करून आंतरराष्ट्रिय ब्लॅक बेल्ट परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली. किमुरा शिकोकाई या जागतीक कराटे असोसिशनचे 3 वरिष्ठ प्रशिक्षक आणि जागतिक ग्रँड मास्टर्स शिहान क्रिस थॉमसन (10th डॅन ब्लॅक बेल्ट), शिहान बिल (10th डॅन ब्लॅक बेल्ट) आणि शिहान लायनेल (10th डॅन ब्लॅक बेल्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली हि आंतरराष्ट्रिय ब्लॅक बेल्ट परीक्षा संपन्न झाली.

 या परिक्षेत किमुरा शुकोकाई कराटे इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आणि संचालक मोहन सिंग यांना 6th डॅन ब्लॅक बेल्ट, तसेच कोनगाव येथील वरीष्ठ कराटे प्रशिक्षण संतोष पाटील आणि टिटवाळा येथील विनायक मार्शल आर्ट आणि फिटनेस झोनचे मुख्य प्रशिक्षक विनायक कोळी या दोघांना 4th डॅन ब्लॅक बेल्ट, त्याच सोबत अभिनेत्री रितिका सिंग हिने देखील या परिक्षेत यशस्वीरित्या यश संपादन करून 3rd डॅन ब्लॅक बेल्ट, आणि कराटे प्रशिक्षक फौझान खान याला 2nd डॅन ब्लॅक बेल्ट या पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करत जागतिक ब्लॅक बेल्ट परिक्षेत यशस्वीरित्या यश संपादन करणे हि अतीशय अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे सर्वच स्तरातून या सर्व प्रशिक्षकांचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×