कल्याण/संघर्ष गांगुर्डे – प्लास्टिक पिशव्या वापर बंदी असून केडीएमसी मार्फत वारंवार सूचना , जनजागृती आणि वेळप्रसंगी दंड आकारूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला असून पुन्हा प्लास्टिक पिशव्या वापर करणाऱ्या विरोधात केडीएमसीने धडक कारवाई सुरू केली असून कारवाई दरम्यान वारंवार सापडल्यास सुमारे 25 हजार रुपये दंड आणि पोलीस ठाण्यात संबधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय केडीएमसी ने केला असून आता तरी कल्याण डोंबिवलीकरांनी सावध व्हा
केडीएमसी हद्दीत फेरीवाल्यापासून दुकानांमध्ये पुन्हा एकदा प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होवू लागला आहे .पालिकेच्या घनकचरा विभागाने बेकायदेशीर प्लास्टीक वापर करणाऱ्या विरोधात धडक कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल केला असून जनजागृती करून ही केडीएमसी हद्दीत फेरीवाले आणि दुकानदार नियम पाळत नसल्याने पालिकेच्या घनकचरा विभागाला कचरा वर्गीकरण करताना अडथळे निर्माण झाल्याने आता पालिका घनकचरा विभाग उपायुक्त रामदास कोकरे यांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे .मागील वर्षा पेक्षा दंडात 10 टक्के वाढ झाली असून पहिल्यांदा प्लास्टिक पिशवी वापर करताना सापडल्यास पाच हजार , दुसऱ्यांदा दहा हजार रुपये आणि तिसऱ्यांदा 25 हजार रुपये आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची तरतूद असून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्याची माहिती पालिका घनकचरा विभाग उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली .कल्याण रेल्वे स्थानक बाहेरील परिसरात मंगळवार ता 7 डिसेंबर रोजी सुमारे 15 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून पहिल्या टप्यात कल्याण , डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेरील आणि हळूहळू शहरात गर्दीच्या ठिकाणी या कारवाई करण्याचे संकेत कोकरे यांनी दिले आहेत . त्याच बरोबर नागरिकांना आवाहन केले आहे कि कापडी पिशवीचा वापर करा. बाजारात गेल्यावर प्लास्टिक पिशव्या मागू नका, स्वच्छता अभियानात नागरिकांनी आपला संयोग द्या.
यापूर्वीच्या कारवाईचा तपशील
सन 2017 – 18 ;- सुमारे 6 लाख 2 हजार 702 रुपये दंड वसूल
सन 2018- 19 ;- सुमारे 7 लाख 31 हजार 250 रुपये दंड वसूल
सन 2019 – 20 ;- सुमारे 11 लाख 46 हजार 900 रुपये दंड वसूल
सन सन 2020 – 21 ;- सुमारे 71 लाख 30 हजार 200 रुपये दंड वसूल