नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
केंद्रीय कोळसा मंत्रालयाने 141 कोळसा खाणींसाठी 3 नोव्हेंबर 2022 रोजी व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाची सहावी फेरी आणि त्यासाठीच्या दुसऱ्या प्रयत्नाला सुरू केली होती. उद्योग क्षेत्राकडून असलेली कोळशाची मागणी लक्षात घेऊन तसेच व्यवसाय सुलभतेला चालना देण्याच्या दृष्टीने मंत्रालयाने यापुढे, परफॉर्मन्स बँक गॅरंटीसाठीची पहिली तपासणी उजळणी ही, संबंधीत खाणी खुल्या करण्याची परवानगी दिल्यानंतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
या अंतर्गत आता निविदेशी निगडीत कागदपत्रांमधील तरतुदींनुसार, यशस्वीरित्या लिलाव झालेल्या प्रत्येक कोळसा खाणीसाठी, सादर कराव्या लागणाऱ्या परफॉर्मन्स बँक गॅरंटीमध्ये, दरवर्षी त्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एप्रिल महिन्यात राष्ट्रीय कोळसा निर्देशांकाच्या आधारे तपासणी करून सुधारणा केली जाणार आहे. 2020 मध्ये व्यावसायिक कोळसा खाणींसाठी पहिला लिलाव सुरू झाल्यापासून, राष्ट्रीय कोळसा निर्देशांकांत दुप्पटीने वाढ झाली आहे, ही बाब लक्षात घेऊनच परफॉर्मन्स बँक गॅरंटीमध्ये शिथीलता मिळावी यासाठी, कोळसा मंत्रालयाला उद्योगक्षेत्राकडून असंख्य निवेदने प्राप्त झाली आहेत. राष्ट्रीय कोळसा निर्देशांकांत झालेल्या अभूतपूर्व वाढीमुळे, ज्या निवीदा यशस्वीपणे स्विकारल्या गेल्या आहेत आणि कार्यवाहीच्या बाबतीत त्यांच्या खाणी या प्रत्यक्ष कार्यान्वित होण्याआधीच्या टप्प्यापर्यंत पोहचल्या आहेत, अशांवरचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात वाढला आहे, आणि या सगळ्यामुळे खाणी कार्यान्वित करण्याच्या कामांसाठी निधी कसा उपलब्ध करावा, ही नवी समस्या निर्माण झाली असल्याचे या निवेदनांमध्ये म्हटले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर खाणी कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेदरम्यान अशा निविदाधारकांवरील आर्थिक भार कमी करण्याकरता गुंतवणूकदाराभिमुख उपक्रम वा उपाययोजना राबवावी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. याद्वारे व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावात निविदाधारकांचा सहभागही वाढेल असे अपेक्षीत आहे. याच अनुषंगाने सध्या सुरू असलेल्या लिलाव फेरीत ही नवी सुधारणा लागू करता यावी यासाठी कोळसा मंत्रालयाने, लिलावासाठीची अंतिम तारखेला मुदतवाढ देत, ती आता 13 जानेवारी 2023 ऐवजी 30 जानेवारी 2023 अशी केली आहे.