नेशन न्यूज मराठी टीम.
उल्हासनगर/प्रतिनिधी – गुरुद्वारातून प्रसाद आणण्याच्या बहाण्याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गुरुद्वाराच्या पाठीमागे असलेल्या इमारतीच्या जिन्यात घडली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे. आवतार अंकल असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी कुटूंबासह उल्हासनगर शहरातील तीन नंबर भागात राहत असून ती नित्यनेमाने घरानजीक असलेल्या गुरुव्दारात पाहटे साडे चार ते सकाळी सहा वाजेपर्यत प्रार्थना करण्यासाठी जात असे, तर आरोपी हा त्याच परिसरात असलेल्या एका गुरुद्वारात ग्रथंपठणचे काम करत असल्याने दोघांची ओळख होती. त्यातच आरोपीची पीडित मुलीवर बऱ्याच दिवसापासून वाईट नजर असल्याने तो तिला एकटीला गाठून तिच्यावर अत्याचार करण्याच्या प्रयत्नात होता. विशेष म्हणजे आरोपी गुरुद्वाराच्या पाठीमागे असलेल्या इमारतीत राहत असल्याने १९ एप्रिल रोजी सकाळी पीडित मुलीला आरोपीने गुरुद्वारातुन कढी चावलं चा प्रसाद आणण्याचे सांगितले. त्यामुळे पीडित मुलगी पुन्हा गुरुद्वारात येऊन प्रसाद घेऊन ती आरोपीच्या घरी निघाली असता, आरोपी हा राहत असलेल्या इमारतीच्या खालीच उभा असताना प्रसाद घेऊन ती त्याच्याजवळ येताच त्याने पीडित मुलीला त्याच्या घरी घेऊन जात असताना इमारतीच्या जिन्यामध्येच तिच्याशी अश्लील चाळे करत तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला.
या घटनेमुळे भयभीत झालेल्या पीडित मुलीने त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घर गाठले. घरी येताच तिच्यावर घडलेला प्रसंग आई व मोठ्या बहिणीला सांगताच संपूर्ण कुटूंब भयभीत झाले होते. दरम्यान, दुसऱ्या दिवशी धाडस करून पीडित मुलीने आई व बहिणीसह मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून तिच्यावर घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच, पोलिसांनी आरोपी आवतार अंकल विरोधात २० एप्रिल रोजी भादंवि कलम ३५४(ब), ३५४ सह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल होऊन पाच दिवस झाली पण आरोपीला अजूनही अटक झालेली नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.