प्रतिनिधी.
कल्याण – कल्याण ग्रामीण भागात शहरीकरण झाल्याने विकास आणि नागरीकरण मोठ्याप्रमाणात होऊन उद्योग धंदे उभे राहिले आहे याचा फायदा आता गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असणार्या या भागाकडे मोर्चा वळवला आहे कांबा गावातील ग्रीन मिडोस हॉल मध्ये बुधवारी ता .०९ रात्री लग्न संभारंभात वृद्ध महिलेच्या डोळ्यात मिर्ची फूड टाकून ४० तोळ्यांची दागिने चोरण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेने महिलेला चोरटीला पकडून चोप देऊन कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोठया प्रमाणात चोरट्या महिलेला पकडलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने घटनेची तीव्रता माहिती झाली आहे सरकारने हॉटेल आणि हॉल यांना उघडण्याची परवानगी दिल्याने लग्न सभांरंभाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत कल्याण ग्रामीण भागातील कांबा गावातील टाटा पॉवर जवळ मोहन ग्रीन मिडोस हॉल मध्ये म्हारळ आणि भिवंडी वरवधूचा लग्नाचा विवाह सोहळा बुधवारी ता .०९ रात्री सुरू होता त्यावेळी पाटील नावाच्या महिला चोरटीन वृद्ध महिलेच्या गळ्यातील ४० तोळे आसपास असणारा हार चोराला बाजूला असणाऱ्या सतर्क महिलांनी आणि पुरुषांनी तात्काळ धाव घेत चोरट्या महिलेला पकडून चोप दिला आणि त्यानंतर म्हारळ चौकीतील पोलिसांना खबर देत स्वाधीन केले. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने ही घटना कांबा येथील मोहन ग्रीन मिडोस हॉल मधील असल्याचे समोर आले आहे यासाठी ग्रामपंचायतील कर्मचारी यांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या आणि पोलिसांनी आरोपी महिला ताब्यात घेऊन चोरीचा गुन्हा दाखल केला आहे . ग्रामीण भागात आता गुन्हगारी मंडळीने मोर्च्या वळवला आहे असे दिसून येत आहे .दरम्यान या प्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करीत आहे