नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी – मागील काही दिवसांपासून राज्याच्या मंत्री मंडळातील मंत्री महोदय आणि काही आमदार हे सतत इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच महाराष्ट्रातील थोर समासुधारक आणि महापुरुष यांच्या बद्दल अपमानजनक वक्तव्य करत आहेत.
नुकतेच आपल्या मंत्री मंडळातील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भिक मागून शिक्षण संस्था उभारल्या असल्याचे बेताल वक्तव्य केले आहे. याचा निषेध करत इंदिरा चौक डोंबिवली पू.येथे डोंबिवलीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या फोटोला जोडे मारत निषेध आंदोलन करण्यात आले.त्याच प्रमाणे चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषनाही देण्यात आल्या.
राष्ट्रपिता ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांचा अपमान करणाऱ्या हरामखोर भा. ज. पा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा व त्याची मंत्री मंडळातून हाकलपतट्टी करण्यात यावी ही प्रमुख मागणी वंचित बहुजन आघाडी डोंबिवली पू कमिटीच्या वतीने जोडे मारो आंदोलनात करण्यात आली.
यावेळी डोंबिवली पू. अध्यक्ष सुरेंद्र ठोके महसचिव मिलिंद साळवे, बाजीराव माने, सचिव नंदू पाईकराव, दीपक भालेराव संघटक अर्जुन केदार, अशोक गायकवाड, कामगार नेते लक्षण हजारे विजय इंगोले,ज्ञानू अंभोरे, संतोष खंदारे, निलेश कांबळे, संदीप साळवे, कपिल अंभोरे, महिला सचिव वैषालीताई कांबळे, पूजाताई कांबळे, ढेरे ताई यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.