धुळे/प्रतिनिधी – धुळे शहरातील देवपूर मतदान केंद्र क्रमांक 29 एल एम सरदार हायस्कूल येथे गेल्या अर्धा तासापासून मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनच सुरू झाले नसल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली आहे. यामुळे मतदार मतदान सुरू होण्याची वाट पाहत असून प्रशासनाकडून मतदान सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान प्रक्रिया लवकरच सुरळीत व्हावी यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे मात्र अद्याप पर्यंत मतदान सुरु न झाल्याने नागरिकांमध्ये रोज देखील बघायला मिळत आहे.
Related Posts