नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण –कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण (पश्चिम) येथे सदर आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
बुधवारी १ जून रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार असून आरक्षणाबाबत हरकती व सूचना (महापालिका आयुक्त यांच्या नावाने) बुधवार दिनांक १ जून २०२२ ते सोमवार दिनांक ६ जून २०२२ (दुपारी 3.00 वाजेपर्यंत) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, महापालिका भवन, तळमजला, शंकरराव चौक, (कल्याण पश्चिम) अथवा संबंधित प्रभाग क्षेत्र कार्यालय येथे सादर कराव्यात असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रथमच त्रिसदस्यीय पद्धतीने निवडणूक घेण्यात येणार आहे २०११ च्या जनगनना झाली नसल्याने नैसर्गिक संख्या वाढीचा विचार करून पालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक पालिका निवडणुकीसाठी १३ प्रभागांची वाढ करीत यंदाच्या निवडीसाठी १३३ सदस्य निवडीसाठी तीन सदस्यांचे ४३ व चार सदस्यांच्या एक पॅनल असे ४४ पॅनल १३३ प्रभागांसाठीचे असणार आहेत .