नेशन न्यूज मराठी टिम.
जळगाव/प्रतिनिधी– चोपडा तालुक्यात पावसाळी कांद्यासोबत उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. सध्या उन्हाळी कांदा काढणीला सुरुवात झालेली आहे. परंतु उन्हाळी कांद्याला भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हा संकटात सापडलेला आहे. ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस असे अनेक संकट पार करत असताना कांद्याला भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.
खानदेश म्हटलं तर ४२ ते ४५ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. या तापमानामध्ये २०० ते २५० रुपये रोजाने मजूर लावून कांदा काढणी सुरू आहे. लागलेला खर्च भरमसाठ असून बाजारात उन्हाळी कांद्याला भाव नसल्याने लागलेला खर्च तो देखील निघणार नाही. यासाठी ज्यावेळेस कांद्याचा भावत वाढ होईल त्यावेळी कांदा विक्री करू अशी भूमिका आता कांदा उत्पादक शेतकरी घेत आहे. साठवण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तो वेगळा खर्च सहन करावा लागणार आहे. कांदा जेवढ्या दिवस साठवला जाईल त्यामध्ये खराब होण्याचे प्रमाण देखील वाढत जाईल. सरकारने कांद्याला हमीभाव द्यावा अशी ही मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यां कडून होताना दिसत आहे.