महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ताज्या घडामोडी राजकीय

लोकांना परिवर्तन हवं असल्याने लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पसंती देणार – अनिल देसाई

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचे झंझावात सुरू आहे. मुंबईत ही सर्वच पक्ष आपापल्या मतदार संघात प्रचार करीत आहेत. मविआचे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई हे आपल्या मतदार संघातील प्रत्येक मतदाराशी संपर्क करत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.त्यांना यावेळी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याच बरोबर ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी गुरुवारी सायंकाळपासून विविध विभागांमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

दक्षिण मध्य मुंबई उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना विभाग क्रमांक अंतर्गत शाखा असणाऱ्या चेंबूर परिसरामध्ये नागरिकांना, धार्मिक स्थळांमध्ये जाऊन त्याठिकाणी असणाऱ्या मंदिरांमध्ये दर्शन घेत आहेत अनिल देसाई ज्याठिकाणी जात आहेत त्याठिकाणी नागरिकांचा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास येत आहे

यावेळीचा शिवसेनेचा उमेदवार अभ्यासू आणि अनुभवी असून आपल्याला त्यांना लोकसभेत पाठवायचं आहे, अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. तर लोकांनी आपल्या समस्या माझ्यासमोर ठेवल्या असून लोकांना परिवर्तन हवं आहे, म्हणून लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या उमेदवारालाच पसंती देणार, असे अनिल देसाई म्हणाले आहेत.

Translate »
×