नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – महाराष्ट्रातील पहिले रामसर दर्जा प्राप्त असलेले निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य हजारो किलोमीटर अंतर पार करून पक्षी अभयारण्य मध्ये आले आहेत. त्यात विविध प्रजातीच्या पक्ष्यांचा समावेश आहे. त्यात कॉमन क्रेन , किनबिल, ओपन, गडवाल , पेंटेन व्हिजल , मास्स हरिअर अशा प्रजाती आहेत.
एकूण 18 ते 19 हजार पक्षी आल्याचा अंदाज पक्षी अभयारण्यातिल गाइड यांनी माहिती देतांना संगीतले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने पक्षी आल्यामुळे पक्षी प्रेमींसाठी एक सुंदर अशी पर्वणीच आहे. पक्षांचे छायाचित्रण करण्यासाठी पक्षी प्रेमी दूर दूरवरून या ठिकाणी येत असून पक्षांचे छायाचित्र आपल्या कॅमेरात कैद करत निसर्गाचा आस्वाद घेत आहेत.